Daily Horoscope Today Today Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Anjali Potdar

दैनिक पंचांग - रविवार २९ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. द्वादशी श्राध्द. तिथी - द्वादशी १६|४८. रास-सिंह. नक्षत्र-मघा. योग-साध्य. करण-तैतिल. दिनविशेष-१७ प. चांगला

मेष - आजच्या दिवसात मोठ्या प्रवासाचे योग दिसत आहेत. धार्मिक कार्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हाल. मनासारख्या गोष्टी सहज घडताना आज दिसून येईल.

वृषभ - कीर्ती, प्रसिद्धी मिळण्याचा आजचा दिवस आहे. प्रवास घडतील प्रवासामधून कामाची निगडित गोष्टी वाढीस लागतील. आपल्या बॉसकडून आपले कौतुक होईल.

मिथुन - अपेक्षा उंचावणं काही वाईट नसते. आज अनेक अपेक्षा आपण ठेवलेल्या सिद्धीस जाताना दिसून येत आहे. नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाल. दिवस चांगला जाईल.

कर्क - कलह, मनस्ताप, कटकटी, अनारोग्य, दुःख, दैन्य अशा गोष्टींनी आज दिवस भरलेला असेल. उत्तम उपाय म्हणजे मनस्ताप टाळणे आणि शांत बसणे. खर्चावर आळा घाला.

सिंह - ऐटित राहणे आज चांगले जमेल. इतरांवर आपला प्रभाव राहील. स्वतः साठी काही नवीन गोष्टी खरेदी करण्याची इच्छा होईल. आपले व्यक्तिमत्व फुलून येईल.

कन्या - हिशोब, खर्चाचा ताळमेळ, योग्य गुंतवणुकीसाठी धडपड, केलेली गुंतवणूक मुदत संपते आहे त्याचे पैसे मिळवण्यासाठी धडपड, असा आजचा दिवस बँकांच्या कामासाठी भारलेला असेल.

तूळ - भावंडांचे सहकार्य चांगले मिळेल. जोडीदारापासून भाग्योदयाच्या संधी आहेत. आपल्यावर सगळ्यांचे प्रेम आहे हे आज जाणून येईल.

वृश्चिक - घरगुती गोष्टींमध्ये अडकून जाल. कामाच्या व्यापावर पण तेवढेच लक्ष द्यायला पाहिजे हे नंतर समजेल. न संपणाऱ्या गोष्टींचा ससेमिरा मागे लागणार आहे असं दिसते आहे.

धनु - कला, मनोरंजन क्षेत्रांमध्ये आघाडी मिळवाल .आपले मन रमण्यासाठी अनेक गोष्टी कराल. आज दत्त उपासना फलदायी ठरणार आहे. निर्णय योग्य ठरतील.

मकर- हाताखालील लोकांपासून सावधानतेचा आज इशारा आहे. विनाकारण आपला अपमान होईल. तब्येतीच्या कुरबुरी राहतील. आपले कर्म चांगले ठेवा.

कुंभ - जोडीदाराबरोबर प्रेम वाटेल. प्रवास घडतील. व्यवसायामध्ये वृद्धी होईल. कोर्ट कचेरीचे निकाल मनाप्रमाणे लागतील. दिवस चांगला राहील.

मीन - कधीकधी मन हतबल होते. काय करावे सुचत नाही. केलेल्या गोष्टींमध्ये यशही मिळत नाही. आज असा दिवस आहे. यापेक्षा हातावर हात धरून बसावे असे वाटेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: ओल्या केसांमध्ये सिंदूर का लावू नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण...

Marathi News Live Updates : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

Mumbai News : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

Viral News: शाब्बास पठ्ठ्यांनो! कपडे शिलाईसाठी तरुणांचा हटके जुगाड, थेट बाईकचा वापर करुन काम केलं सोपं; पाहा VIDEO

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

SCROLL FOR NEXT