Rashi Bhavishya Today 26 June 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya Marathi : आजचे राशी भविष्य, बुधवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय? जाणून घ्या

Horoscope Today 26 June 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार दररोज ग्रहमानात बदल होतात. या बदलाचा परिणाम थेट तुमच्या राशीवर होतो. राशीचक्रानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशीभविष्य...

Anjali Potdar

दैनिक पंचांग - २६ जून २०१४

वार - बुधवार. तिथी- ज्येष्ठ कृष्ण पंचमी. नक्षत्र- धनिष्ठा. योग -विष्कंभ.करण - कौलव. रास -कुंभ. दिनविशेष -उत्तम दिवस.

मेष : मनाला वेगळीच उभारी मिळेल

मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. ठरवेल ते होते आहे हे बघून मनाला एक वेगळी उभारी मिळेल. आपल्यामुळे इतरांना सुद्धा ऊर्जा मिळणार आहे.

वृषभ : चांगल्या गोष्टी वाढीस लागतील

कामाच्या ठिकाणी वातावरण खेळीमेळीचे राहील. त्यामुळे एक वेगळीच उभारी येईल. काहींना प्रवासही घडतील. त्या प्रवासात नवीन कामाचे प्रस्ताव येतील. चांगल्या गोष्टी वाढीस लागतील. एकूण दिवस किर्ती आणि संपदा प्राप्त करण्याचा आहे.

मिथुन : सकारात्मकता मिळेल

उपासनेला आज विशेष बळ मिळेल. देवावरचा विश्वास आढळ राहील. जे मनात येईल त्याला सकारात्मकता मिळेल. काही जणांना प्रवासाचे योग आहेत. धर्म आणि अध्यात्म यांत दिवस चांगला जाईल.

कर्क : त्रासल्यासारखे होईल

आज मनासारख्या गोष्टी काही होताना दिसत नाहीत. आपली रास भावनिक त्यामुळे थोडं काही झालं तरी त्रासल्यासारखे होते. आज मन घट्ट करा आणि येणाऱ्या गोष्टींना सकारात्मकतेने सामोरे जा.

सिंह : संधीचे सोने करा

कोर्टाची काम असो, प्रवास असो, परदेशगमनाचे योग, असो संततीच्या भवितव्य वाढीसाठी आजचा दिवस छान योग घेऊन आला आहे. या संधीचे सोने करा.

कन्या : तब्येतीच्या तक्रारी वाढतील

विनाकारण डोक्यात विचारांचे थैमान घालून घेऊ नका. शत्रू त्रास देतीलच. पण त्याच्यावर कुरघोडी कशी करायची हे लक्षात ठेवा आणि पुढे चला. तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. पोट जपा.

तूळ : अनेक गोष्टींमध्ये मन रमेल

पैशाची इतर गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कला, मनोरंजन या गोष्टींमध्ये मन रमेल. संतती सौख्य लाभेल.

वृश्चिक : निर्णय लाभदायक ठरतील

राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. जमीन - जुमला, जनावरे यासाठी विशेष काही व्यवहार आज होतील. आपण जे निर्णय घ्याल ते पुढील दृष्टीने लाभदायक ठरतील.

धनु : नवी ताकद मिळेल

पत्रव्यवहार मार्गी लागतील. भावंडांचे विशेष सौख्य मिळेल. संकटाशी दोन हात करण्याची ताकद आज मिळणार आहे. दिवस चांगला.

मकर : गुंतवणुकीसाठी चांगला दिवस

पैशाची आवक चांगली राहणार आहे. काही गुंतवणूक करत असाल तर त्या दृष्टीने दिवस छान आहे. कुटुंबीयांचा सल्ला, मोठ्या लोकांचा सल्ला आज मार्गदर्शक ठरेल.

कुंभ : सकारात्मकता वाढेल

छान सकारात्मकता वाढीला लागेल. आपली रास बौद्धिक रास असल्यामुळे खरंच जे कराल त्या गोष्टीत आज विशेष आनंद मिळेल. स्वतःकडे विशेष लक्ष द्या. आपल्यातच मशगुल रहाल.

मीन : मनाचा कौल बघा

कोणत्याही बंधनात आज अडकू नका. आपल्या मनाचा कौल बघा आणि त्या दृष्टीने पावले उचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT