Siddhi Hande
थंडीत काहीतरी कुरकुरीत पदार्थ खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. तुम्ही नाश्त्याला कुरकुरीत पालक पकोडा बनवू शकतात.
पालक, बेसन, तांदळाचे पीठ, कोथिंबीर, मिरची-लसूण पेस्ट, हळद, ओवा, मीठ, धने आणि जिरेपूड
पालक पकोडा बनवण्यासाठी सर्वात आधी पालक बारीक चिरुन घ्या.
यानंतर एका भांड्यात चिरलेला पालक, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, कांदा, कोथिंबीर, मिरची लसूण पेस्ट, धने आणि जिरेपूड टाकायचा आहे.
यामध्ये तुम्ही ओवा, हळद आणि मीठ टाकून मिक्स करा.
यानंतर या पीठात पाणी न टाकता सर्व मिश्रण मिक्स करा. यात पाणी बिल्कुल पण टाकू नका.
हे पीठ जास्त जाड आणि पातळ नसावे. जेणेकरुन भजी कुरकुरीत होतील.
पालकला पाणी सुटते.यामुळे पीठ आपोआप मिक्स होते. त्यात पाणी टाकण्याची गरज नाही.
यानंतर एका कढईत तेल गरम करा. गरम तेलात पालकचे छोटे छोटे गोळे सोडा.
यानंतर हे भजी कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. हे पालक पकोडा चटणीसोबत खाऊ शकता.