ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खूप काही करतो. पण कधीकधी डाग आणि ब्लॅकहेड्स आपल्या सौंदर्याला कमी करतात.
ब्लॅकहेड्स चेहऱ्याच्या विशिष्ट भागांवर, जसे की नाक, गाल, कपाळ आणि हनुवटीवर येतात. जेव्हा त्वचेची छिद्रे बंद होतात, तेव्हा ब्लॅकहेड्स तयार होतात.
अनेक स्त्रिया विविध स्क्रब पॅक वापरून आपला चेहरा स्वच्छ करतात. पण यामुळे ब्लॅकहेड्स फक्त तात्पुरतेच निघून जातात.
जर तुम्हीही ब्लॅकहेड्समुळे त्रस्त असाल, तर काही घरगुती फेस स्क्रब वापरून पहा. त्यामुळे ब्लॅकहेड्स बऱ्याच प्रमाणात कमी होतील.
बेसनमध्ये कच्चे दूध आणि कॉफी मिसळून एक स्क्रब तयार करा. तो चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी चोळा. यामुळे ब्लॅकहेड्स कमी होतील आणि त्वचेच्या डेड पेशी निघून जातील.
मुलतानी माती, वाटलेली मसूर डाळ आणि मध एकत्र करून एक स्क्रब तयार करा. हा स्क्रब चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी वापरा.
दह्यामध्ये टोमॅटो आणि लिंबाचा रस मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर हातांनी चेहऱ्यावर हळुवारपणे स्क्रब करा.
दालचिनीची पावडर मधात मिसळून स्क्रब तयार करा. हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर चेहरा हलक्या हातांनी स्क्रब करा.
ओट्समध्ये कच्चे दूध आणि मध मिसळून स्क्रब बनवा. त्यानंतर तो चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा. यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होईल आणि त्वचेची छिद्रे मोकळी होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.