Daily Horoscope Today Today 24 September 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशींच्या नशिबात आज यशाचे योग; नक्कीच भाग्यकारक घटना घडतील

Anjali Potdar

आजचे पंचांग - मंगळवार २४ सप्टेंबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. कालाष्टमी अष्टमी श्राध्द. तिथी-सप्तमी १२|३९ पर्यंत. नं. अष्टमी. रास-वृषभ ०९|५५ नं. मिथुन. नक्षत्र-मृग. योग-व्यतीपात. करण-बवकरण. दिनविशेष-व्यतीपात वर्ज्य

मेष - मित्रांनो पितृपक्ष पंधरवडा चालू आहे आपल्या पितरांच्या श्राद्ध कर्म केल्यामुळे आयुष्यातील योग्य दिशा नक्कीच मिळू शकतील. धनाशी निगडित अडचणी असतील तर आज त्या दूर होतील. हा विश्वास ठेवा.

वृषभ - कष्ट आणि मेहनतीच्या ताकतीवर आपण इथेपर्यंत आला आहात. नक्कीच आजच्या दिवसांमध्ये यशाचे योग दिसत आहेत. आपला सकारात्मक भाव इतरांना भावून जाईल हे नक्की.

मिथुन - प्रेमाने आणि बोलून इतरांच्या आपण अनेक गोष्टी करता. पण तितकच गुंज भरून नाही तर तीळभर सुद्धा समोरच्याकडून प्रेम मिळाले नाही तर दुःख नक्की होणार. आज थोडा मनस्तापाचा दिवस आहे. काळजी घ्यावी.

कर्क - संमिश्र दिवस. तसे पहिले तर काही ठिकाणी लाभ तर काही ठिकाणी गोत्यात पाय अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आपण केलेल्या कर्माची फळे वाढीव मिळतील असे दिसते आहे.

सिंह - नोकरी, व्यापार व्यवसाय यामध्ये आगेकूच दिसते आहे. ठरवलेल्या गोष्टी मनाप्रमाणे तशाच होतील .आपल्याला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे आज योग आणि दिवस चांगला जाईल.

कन्या - देवाची उपासना आणि पितरांचे श्राद्ध या दोन गोष्टी आपल्या भागातील अडथळे दूर करणाऱ्या आज ठरणार आहेत. मनापासून मनाने गोष्टी करा भाग्यकारक घटना नक्कीच घडणार आहेत.

तूळ - थोडी फिरती, भ्रमंती थोड्या कटकटी, व्यापार व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. पण तेवढ्याच मोठ्या रिस्क सुद्धा घ्याव्या लागतील. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतीही कामे नकोत. हे लक्षात ठेवा.

वृश्चिक - शांतपणे सोषिकपणे अनेक गोष्टी आपण नेहमी करता. पण काही वेळा त्याची सीमा ओलांडली जाते. आजच्या दिवसामध्ये कामाचा वेग अखंड असेल. कदाचित स्वभावामुळे कोर्टकचेरीच्या कटकटी मागे लागतील असे दिसत आहे.

धनु - चोर, चोरी अशा घटनांचा असे ससेमीरा मागे लागणार आहे. थोडं सावध रहा. आपल्या वस्तू आणि मौल्यवान जिन्नस सांभाळून ठेवा. आपल्या बाबतीत कदाचित या वस्तू आपल्या आठवणींचा एक ठेवा असण्याची शक्यता दाट आहे.

मकर - प्रेमामध्ये यश मिळण्याचा आज दिवस आहे. विद्यार्थी वर्गाला काही गोष्टी सहज आपल्या बाजूने घडताना दिसतील. नवीन ज्ञानग्रहण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ - पाहुण्यांचे आगमन होईल. घरामध्ये सर्वांना एकत्रित येऊन छोटा कार्यक्रम होण्याचे योग दिसत आहेत. सर्वांबरोबर असून सुद्धा आज थोडे अलिप्तपणाची भावना आपल्यामध्ये असेल. संमिश्र दिवस.

मीन - आयुष्यामध्ये मोठी घोडदौड हवी असेल तर दोन पावले मागे यायला लागते. असाच दिवस आहे जुन्या गोष्टींची खपली काढू नका. नव्याने जोमाने कामाला लागा आजच्या दिवसांमध्ये दुप्पट यश दिसत आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Hacks: भात मऊ-मोकळा करायचा आहे? फॉलो करा 'या' टिप्स

Bigg Boss Marathi : आजपासून १३ व्या दिवशी बिग बॉसचा Grand Finale, कोण मारणार बाजी?

Chapati Recipe : हात मोडलेला असतानाही २ मिनिटांत बनवता येईल चपाती; कशी, पाहा VIDEO

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील टोल वसुली करणाऱ्या एजन्सिला ब्रेक; वाहनधारकांच्या तक्रारीवरून MSRDC ची कारवाई

Tomatoes for Skin: टोमॅटोमुळे चेहऱ्याला होतील अनेक फायदे; एकदा नक्की ट्राय करा...

SCROLL FOR NEXT