Daily Horoscope Today 3rd august 2024 Saam TV
राशिभविष्य

Rashi Bhavishya : ऑगस्ट महिन्याचा पहिला शनिवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय, वाचा संपूर्ण राशीभविष्य

Today's Horoscope 3rd August 2024 : आज ऑगस्ट महिन्याचा पहिला शनिवार, मेष ते मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काय घेऊन आलाय, जाणून घ्या राशीभविष्याच्या माध्यमातून...

Anjali Potdar

आजचे पंचांग - शनिवार ३ ऑगस्ट २०२४

आषाढ, कृष्ण पक्ष. तिथी - चतुर्दशी १५|५१ पर्यंत. रास - कर्क नक्षत्र - पुनर्वसु. योग - वज्र. करण - शकुनी. दिनविशेष - चतुर्दशी वर्ज्य.

मेष : धावपळीचा आजचा दिवस

घोड्यावर बसून जावे इतका धावपळीचा आजचा दिवस असणार आहे. ठरवलेली कामे योग्य मार्गाने होतील. पराक्रम पदरात पडेल. लोकांवर आपला अंकुश असेल.

वृषभ : सुट्टीची संधी साधाल

सुना-जावयांशी उत्तम संबंध राहतील. आजचा दिवस आनंदात घालवण्याकडे आपला कल आहे. सुट्टीची संधी साधाल. शेजाऱ्यांशी संबंध दृढ होतील.

मिथुन : बोलण्यावर ताबा ठेवावा

आज मात्र आपण थोडं आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा. काही गैर अर्थ आपल्याविषयी निघण्याची शक्यता आहे. विनाकारण मनस्ताप टाळण्यासाठी देवाची उपासना फलदायी ठरेल. खर्च वाढेल.

कर्क : सकारात्मक विचार येतील

मनमौजी आणि धुंदीत आयुष्य जगावे अशी आज भावना होईल. स्वतःला प्राधान्य क्रमाने महत्व द्या. आरोग्य चांगले राहील. मनात सकारात्मक विचार येतील. नवे कार्यक्रम हाती घ्याल.

सिंह : पैसा बाळगून राहा

आजच्या दिवशी कुठे तुम्ही साक्षीदार राहू नका. कागदपत्रांवर सही करू नका. काळजी घेण्याचा दिवस आहे. पैशाच्या भानगडी येऊ शकतात. पैसा बाळगून राहा.

कन्या : शाबासकीची थाप मिळेल

भावंडांचे प्रेम लाभेल. ठरवाल त्या गोष्टी होतील. एक वेगळी उमेद आणि जिद्द घेऊन आजचा दिवसाचा प्रवास कराल. शाबासकीची थाप मिळेल.

तूळ : वीकेंड कारणी लागेल

घरामध्ये नवीन वस्तूंची खरेदी होईल. वीकेंड कारणी लागेल. आनंदासाठी पैसे खर्च कराल. कुटुंबीयांबरोबर वेळ व्यतीत कराल.

वृश्चिक : उपासनेचा जोर वाढवा

अवघड गोष्टी सोप्या कराव्या लागतील. उपासनेचा जोर वाढवायला लागेल. नको त्या भानगडीत पडून फसण्याची शक्यता आहे. तामसी पेक्षा सात्विक गोष्टी जपा.

धनु : शत्रूंपासून सावध राहा

जुनी दुखणी डोके वर काढ. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. एकूण संकटांचा सामना आज अधिक करायला लागेल. शत्रूंपासून सावध राहा. अडचणी वाढतील.

मकर : कामे मार्गी लागतील

कोर्ट कचेरीचे निर्णय किंवा कामे मार्गी लागतील. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. प्रवासासाठी आजचा दिवस चांगला राहील. सर्व गोष्टींचे नियोजन योग्य असेल तर कामे तडीस जातील.

कुंभ : एनर्जी जपून ठेवा

शारीरिक कष्ट आणि मेहनत यांचा साठी आजचा दिवस आहे. आपली एनर्जी आपणच जपून ठेवा. विनाकारण वाईट गोष्टींच्या मागे लागू नका. चांगले वाईट याचा फरक ओळखा आणि मार्गक्रमण करा.

मीन : भाग्योदयाचा संधी मिळेल

भावनेच्या आहारी वाहून जाऊ नका. घडणाऱ्या गोष्टी टाळता येत नाहीत पण त्याला सकारात्मकतेची जोड द्यावी लागते. आजचा दिवस उत्तम भाग्योदयाचा संधी घेऊन आलेला आहे. त्याकडे डोळे उघडे ठेवून पहा आणि आनंदाने स्वागत करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT