Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : देवी लक्ष्मीची कृपा होणार, उपासना फळाला येणार; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today in Marathi : आजचा दिवस देवीची उपासना करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. आज केलेली उपासना फळाला येणार आहे. वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,३ ऑक्टोबर २०२४, अश्विन शुक्लपक्ष,घटस्थापना, नवरात्रारंभ.

तिथी- प्रतिपदा २६|५९

रास-कन्या २९|०६ नं. तुला

नक्षत्र-हस्त

योग-ऐंद्रयोग

करण-किंस्तुघ्न

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - घटस्थापने सारखा उत्तम दिवस आज आहे. आपल्यातील अमर्यादशक्ती याची जाणीव आज करून घ्या. शत्रूंवर मात कराल. खऱ्याचे खरेच असते हेही जगाला दाखवून द्या.

वृषभ- देवी उपासनासाठी आज तुमच्या राशीला अत्यंत उत्तम दिवस आहे. जी उपासना कराल ती फळाला येईल. फक्त एक लक्षात ठेवा सर्व उपासना या काम्य उपासना नसाव्यात. आज विशेष आत्म उन्नतीसाठी काही गोष्टी कराल तर त्या फायदेशीर ठरतील.

मिथुन - घरामध्ये वेगळेच वातावरण हसरे खेळते आणि चैतन्यमयी वातावरण राहील. देवीच्या आगमनाने पावित्र्य नांदेल. पाहुण्यांची ऊठबस यामध्ये दिवस धावपळीचा आहे.

कर्क - अडचणीच्या वेळी आपल्या चांगल्या स्वभावामुळे शेजारी आज आपल्याला मदत करतील. छोटे प्रवास घडतील. पाप पुण्याच्या संकल्पनांना निर्मल चक्षूने पहाल.

सिंह - जुन्या गोष्टी आणि परंपरा यांचा संगम कुटुंबीयांबरोबर उत्साहाने पार पाडाल. सोने खरेदी किंवा मोठ्या प्रकारचे एखादी गुंतवणूक आपल्याकडून आज होण्याचा दिवस आहे.

कन्या - हसऱ्या खेळत्या वातावरणामध्ये आज तुम्ही रमून जाल. गंमत, जोक, मौज, मजा, मस्ती असे वातावरण आजूबाजूला असेल. मन फुलून निघेल आणि आनंदात भर पडेल.

तूळ - दानधर्मासाठी चांगल्या कामासाठी आपल्या हातून आज पैसे खर्च होतील. याचा हिशोब न ठेवता पुढील चांगल्या कर्माची पायाभरणी झाली आहे असा विचार करा. विनाकारण होणारी मनस्ताप उपासनेच्या माध्यमातून टाळा.

वृश्चिक - घरी कोणाचे आजारपण आणि त्याच्या सेवेसाठी आजचा दिवस जाईल. आपल्यातली ताकद ओळखा. मुळात आपली राशी सोशीक राशी आहे. भावनेने इतरांवर जय मिळवाल. स्नेहभोजनाचे योग आहेत. दिवस संमिश्र असेल.

धनु - कृतीतून कामाचा संदेश इतरांना द्याल. धावपळीचा दिवस असेल पण यशाने सुखावून जाल. आपले वजन आज कार्यक्षेत्रात राहील. सन्मान प्राप्त होतील.

मकर - भाग्यकारक घटना आज घडणार आहेत. उपासनेच्या माध्यमातून प्रेरित व्हाल. दानधर्माने अध्यात्माकडे कल राहील. शिवपार्वती उपासना आज फलदायी ठरेल.

मीन - जिथे संकटे आहेत तिथे देव आपल्याला हात देतो. आज अशी जाणीव होईल. शक्ती उपासना पूर्वी केलेली असल्यामुळे आज त्याच्यासाठी संकटातून निभावून निघाल. संभ्रमित अवस्था टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT