आजचे पंचांग - बुधवार २ ऑक्टोबर २०२४. भाद्रपद कृष्णपक्ष. सर्वपित्री दर्श अमावास्या. अमावास्या श्राध्द. म. गांधी जयंती. तिथी-अमावास्या २४|१९. रास-कन्या. नक्षत्र-उत्तरा. योग-ब्रह्म. करण-चतुष्पाद. दिनविशेष-अमावस्या वर्ज्य.
मेष - पोटाचे दुखणे, उष्णतेचे त्रास आज होऊ शकतात. अर्बट चर्बट खाण्यावर नियंत्रण ठेवा. कोणीही यावं आणि आपला अपमान करावा असा काहीसा दिवस वाटेल. स्वतःला खंबीर करा.
वृषभ - कला मनोरंजन क्षेत्रामध्ये आघाडीवर रहाल. पैशाचे व्यवहार चांगले मार्गी लागतील. अनपेक्षित धनलाभाचे आज योग आहेत. या संधीचे सोने करा.
मिथुन - घरातील लोकांची व्यवसायाला साथ मिळेल. एकत्रितरीत्या घेतलेले निर्णय पुढील गोष्टीसाठी फायदेशीर ठरणार आहेत. आईचा सल्ला आज योग्य मार्गदर्शक ठरेल.
कर्क - जवळचे प्रवास होतील. प्रवासाचा आनंद लुटाल नवीन ओळखी आणि परिचय होऊन कामाच्या कक्षा रुंदावतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील.
सिंह - जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. कुटुंबीय यामध्ये सहकार्य करतील. नकारात्मकता येत असेल तर ती झटकून टाका. घडतील त्या गोष्टी चांगल्याच होतील.
कन्या - आज आपले बदललेले रूप जगासमोर येईल. खूप खंबीर आणि कणखरपणे आपल्या गोष्टी योग्य पद्धतीने मांडाल. वेगळा आवेश आणि उर्मी घेऊन आलेला आजचा दिवस आहे. आपली वेगळी छाप इतरांवर पडेल.
तूळ - खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा या हातून आले आणि त्या हातून निसटले अशी अवस्था होईल. विनाकारण बेचैनी आणि मनस्तापाचा दिवस दिसतो आहे. पण केलेल्या कर्मांचा योग्य न्याय आज मिळेल.
वृश्चिक - नातेवाईकांमध्ये आपली एक वेगळीच प्रतिमा आहे. या प्रतिमेला साजेसे वर्तन आज होईल. खंबीरपणे अवघड गोष्टी सहज पार पाडाल. तुमच्या सहकार्याने इतरांचे कल्याण होईल आणि लाभ पदरात पडतील.
धनु - शरीर आणि मन यांचा मेळ कदाचित आज बसणार नाही. मनाला वाटतं ते शरीराला जे पेलेलच असे आज होणार नाही. प्रवासाचे योग आहेत. चांगल्या व्यक्तींची साथ संगत आज मिळणार आहे.
मकर - शिव उपासना फलदायी ठरेल. ज्येष्ठ लोकांसाठी नातवंडांच्या सुखामध्ये रममाण होण्याचा आजचा दिवस आहे. देवाने दिलेल्या गोष्टी आपल्या चांगल्या कर्मा प्रमाणेच मिळतात हे लक्षात ठेवा.
कुंभ - ससेहोलपट वाट्यास येणार आहे. नाहीतर घोडे मेले ओझ्याने आणि शिंगरू मेले हेलपात्याने अशी अवस्था होईल. संभ्रमित अवस्था टाळण्यासाठी, आहे त्या गोष्टींचा स्वीकार करा. चांगल्या गोष्टी उद्यावर ढकललेल्या बऱ्या असे वाटते आहे.
मीन - नवीन व्यवसाय किंवा त्या व्यवसायाची वृद्धी यावर आपण आणि आपले भागीदार विशेष लक्ष घालाल. सर्वांच्या सहकार्याने पुढे जाण्याचा दिवस आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये सुयश मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.