horoscope today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : आज अचानक धनालाभ होईल, तर काहींनी वाहने जपून चालवावीत; वाचा तुमच्या नशिबात काय लिहिलंय?

Horoscope Today in Marathi : आज काहींना अचानक धनालाभ होण्याची शक्यता आहे. तर काहींनी वाहने जपून चालवावीत. तुमचा आजचा दिवस कसा जाणार, वाचा

Anjali Potdar

आजचे पंचांग

रविवार,२६ जानेवारी २०२५,पौष कृष्णपक्ष,गणराज्य दिन.

तिथी- द्वादशी २०|५५

रास- वृश्चिक ०८|२६ नं. धनु

नक्षत्र- ज्येष्ठा ०८|२६

योग-व्याघात

करण-कौलव

दिनविशेष- आनंदी दिवस

मेष - खर्चाचे प्रमाण काही केल्या आवाक्यात राहणार नाही. "वाढता वाढता वाढे" असा दिवस आहे. वाहने जपून चालवावीत असा मात्र आजसाठी इशारा आहे. वेगावर नियंत्रण हे गरजेचे आहे.

वृषभ- नवी दिशा नवे मार्ग सापडतील. ठरवलेल्या गोष्टी सुनियोजित पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील. कामाची गती चांगली राहील.

मिथुन- सगळे करून "पालथ्या घड्यावर पाणी" असा दिवस आहे. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. त्यांना संभाळून घ्यावे लागेल.

कर्क- दैनंदिन कामामध्ये काही अडचणी निर्माण होताना आज दिसत नाहीत. सुट्टीचा दिवस आनंदाने साजरा कराल. अनेकांचे सहकार्य आज लाभेल.

सिंह - प्रॉपर्टीचे नवनवीन प्रस्ताव समोर येतील. आणि कदाचित ते तुम्ही मान्य कराल. मानसिक सौख्य आणि समाधान लाभल्यामुळे जीवनाला नवीन दिशा आज मिळेल.

कन्या - हाती घेतलेल्या कामांमध्ये यश तर नक्कीच लाभणार आहे. तुमची जिद्द, उमेद आणि बुद्धीच्या ताकतीवर तुम्ही पुढे जाल. दिवस कार्यरत राहण्यात अग्रेसर असेल.

तूळ - कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. एक वेगळा ताळमेळ कुटुंबीयांच्या मध्ये तुम्ही साधू शकाल. अचानक धनालाभाची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

वृश्चिक - आपली मते नेहमीच ठाम असतात आणि त्या विषयात पण आपण आग्रही राहणार आहात. घेतलेली शासकीय कामे आज सुरळीत मार्गी लागतील. असा दिवस आहे.

धनु - वेळ आणि पैसा वायाच जाईल अशी शक्यता आहे. मनस्वास्थ्य शोधण्यासाठी अध्यात्माकडे कल राहील. काळजी घ्या.

मकर - महत्त्वाचे पत्र व्यवहार जे अनेक काळ रेंगाळले होते ते आज पार पडतील. नव्याने काही परिचय होतील. नवीन मित्रमंडळी होतील. त्यांच्यामध्ये आपला वरचढपणा राहील.

कुंभ- राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी होण्याचा आजचा दिवस आहे. कामाला छान चालना मिळाल्यामुळे आपला उत्साह आणि उमेद वाढेल.

मीन - आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस खास आहे. म्हणाल तेवढ्या गोष्टी उत्तम पद्धतीने होतील. एखादी महत्त्वाची वार्ता कानावर येईल. त्यामध्ये आज आपण मशगुल रहाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT