Horoscope Today  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : वाईट काळ भूतकाळात जमा होईल; ५ राशीच्या लोकांना मिळणार मोठं यश, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Horoscope Today in marathi : काही राशींच्या लोकातील आयुष्यातील वाईट काळ भूतकाळ जमा होणार आहे. तर काहींना मोठं यश मिळणार आहे.

Anjali Potdar

आजचे पंचांग

गुरुवार,१० एप्रिल २०२५,चैत्र शुक्लपक्ष,प्रदोष,

महावीर जयंती .

तिथी-त्रयोदशी २५|०१

रास-सिंह १९|०५ नं. कन्या

नक्षत्र-पूर्वा

योग-वृद्धि

करण-कौलव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - सृजनशीलता वाढती राहील. एक वेगळी कामाची खुमखुमी दाटेल. नियोजित कामे घडतील. गणेश उपासना विशेष फलदायी ठरेल. दिवस चांगला आहे .

वृषभ - सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घ्याल. दिवस आनंदाने भरलेला आहे. आपल्या सख्या, चांगल्या, जवळच्या लोकांच्याकडून आपुलकीची भावना मिळेल. त्यामुळे मनस्वास्थ चांगले राहील.

मिथुन - भावंडे सौख्य चांगले मिळेल. प्रवासातून फायदा होईल. सन्मान, पारितोषिक अशा आवडीच्या गोष्टी आज यशाची माला पडेल. दिवस चांगला आहे.

कर्क - धनधान्याची मुबलकता आहे. कुटुंबीयांबरोबर आनंदी क्षण साजरे कराल. दीर्घ मुदतीच्या ठेवी, सुवर्ण, अलंकार यांचे हिशोब यामध्ये आज दिवस व्यस्त राहील.

सिंह - आत्मविश्वासाने कामाला लागाल. सुयोग्य आणि सुनियोजित दिवस असेल. आपल्या प्रभावामुळे समोरचे लोक आपल्यावर फिदा होतील. काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी येईल.

कन्या - जीवनाची वाट खडतर असेल तरी त्यातून सहज मार्ग काढाल. प्रेमामध्ये फसवणुकीची दाट शक्यता आहे. मनस्वास्थ्य तोळा मासा राहील.

तूळ - शेजारी आपल्या वागण्यामुळे प्रभावित होतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. पैशाचे व्यवहार सुरळीत होतील. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - कामाचे कामाचे स्वरूप अचानक कलाटणी घेईल. पण येणाऱ्या गोष्टीला निधड्या छातीने पुढे जा. सहकारी आपल्या पावलावर पावले टाकतील, एवढी कामे चांगली होतील. समाजकारणात यश आहे.

धनु - सद्गुरु कृपा होईल. मोठ्या प्रवासा मधून फायदा होईल. नातवंडांच्याकडून चांगल्या बातम्या कानावर येतील.भाग्यकारक घटना घडतील.

मकर - अचानक पैसा, धनलाभ आज होईल. जुन्या गोष्टी नव्याने उकरून काढू नका. नातेसंबंध जपण्यासाठी धडपड करावी लागेल. दिवस संमिश्र आहे.

कुंभ - "भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी मारू काठी" असा आपला स्वभाव आहे. आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी खड्यासारख्या दूर कराल. कोर्ट कचेरी मध्ये यश दिसते आहे.

मीन - मामाचे विशेष प्रेम लाभेल. चोरी, चोरी यांपासून काळजी घ्यावी लागेल. महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस सांभाळावे लागतील. नोकरीत मात्र प्रगती दिसते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT