Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : शिव उपासना विशेष फलदायी ठरेल, गोड बोलून समोरच्याला वश कराल; वाचा आजचे राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,२२ ऑक्टोबर २०२४, अश्विन कृष्णपक्ष.

तिथी- षष्ठी २५|२९

रास- मिथुन

नक्षत्र-आर्द्रा

योग-परिघ

करण-गरज

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - डोके शांत ठेवून काम करण्याची आज गरज आहे. नाहीतर झालेल्या गोष्टीवर पाणी फिरवाल.काही वेळेला बुद्धीने तर, काही वेळा युक्तीने काम करावे लागते. आज युक्तीने काम करण्याचा दिवस आहे.

वृषभ - आगीतून फोफाट्यात असे होत नाहीये ना? याचा चार वेळा विचार करा. जुन्या गोष्टी घडलेल्या पुन्हा चुका करू नका. पैशाशी निगडित निर्णय सुधाराल.

मिथुन- गोड बोलून समोरच्याला वश कराल. व्यवसाय, व्यापारामध्ये वृद्धीचा दिवस आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पडेल.

कर्क - पैशाच्या खर्चावर आळा घलणे आज गरजेचे आहे. विनाकारण आपला हात आज सढळ होतोय हे तुम्हालाही जाणवेल. आपल्या वस्तू सुद्धा जपा.

सिंह - नको त्या गोष्टीची उगाच लांबड लावू नका. काही गोष्टी सहजगत्या आज आपल्या पदरात सकारात्मक येणार आहेत . त्या तशाच घ्या. लांबणीवर घटना टाकू नका.

कन्या - आपले निर्णय आपल्या सहकाऱ्यांना रुचतील. वरिष्ठा वर्गाकडून आज आपले कौतुक होईल. बौद्धिक गोष्टींच्याकडे विशेष लक्ष द्या. त्याचा कौल विचारात घ्या.

तुळ - आज मितीला आपल्याला जे मिळाले आहे त्यासाठी देवाकडे कृतज्ञता व्यक्त कराल. भगवंतावरचा विश्वास पक्का होईल. उपासनेच्या दृष्टीने दान, दानधर्म याच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष चांगला आहे.

वृश्चिक - दिवस मृत्यूतुल्य पिडा देणारा आहे. आपलेच आपल्या पाठीत खंजीर खूपसतील. शरीरिक मेहनत आणि कष्ट याचा आलेख उंचावेल.

धनु - कोर्टाची कामे मागे असल्यास आज तुमच्या बाजूने कौल लागेल. पैशासाठी हात आखडता घ्यावा. व्यवसाय वृद्धी होण्याचा संभव आहे.

मकर - गुडघे आणि सांधेदुखीची दुखणे डोके वर काढतील. जे सहज शक्य आहे अशाच गोष्टींमध्ये विशेष लक्ष द्या. अंगावर ओढून कामे घेऊ नका.

कुंभ - शेअर मधील गुंतवणूक, लॉटरी मधून पैसा आज संभवतो आहे. योग्य मार्गाने पैसा मिळवा. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल. संतती सौख्य उत्तम राहील.

मीन - घरी धार्मिक कार्यक्रम घडेल. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील. घरातील मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन पार पाडाव्या लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: वास्तुनुसार घरात कोणत्या दिशेला घड्याळ लावावे?

Salman Khan : चुलबुल पांडे 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार नाही, समोर आलं धक्कादायक कारण

Maharashtra News Live Updates: अजित पवार गटाचे नेते नाना काटे तुतारी फुकण्याच्या तयारीत

Cylinder Blast : सिलेंडरचा स्फोट, अख्खं घर कोसळले; पती-पत्‍नीसह ५ जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

Maharashtra Politics: नगरचं राजकारण तापलं! काल जयश्री थोरातांनी झापले, आज सुजय विखेंनी पुन्हा डिवचले!

SCROLL FOR NEXT