ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या नक्षत्रातल्या बदलाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ९ ऑक्टोबर रोजी शनीने उत्तर भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. या नक्षत्रात ८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुढच्या ११८ दिवस वृषभ, मिथून, तूळ, मकर आणि कुंभ या पाच राशींसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. नोकरीतल्या संधी, आर्थिक स्थिती आणि रखडलेली कामं याबद्दल या राशींच्या व्यक्तींना दिलासा मिळण्याची शक्यता ज्योतिषीय अंदाजातून व्यक्त केली जात आहे.
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक बाबतीत अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ हळूहळू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामात सातत्य ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
मिथुन राशीच्या लोकांची रखडलेली कामे पुढे सरकू शकतात. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात अडथळे येत असतील, तर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कामातील मेहनतीचे कौतुक होऊ शकते. मात्र, महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक गोष्टीचा विचार करून पुढचे पाऊल उचला.
तूळ राशीच्या नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नती किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेतही दिले जात आहेत. मात्र, कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मेहनत आणि नियोजन आवश्यक असेल.
मकर राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. नवीन नोकरी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन केल्यास पैशांबाबत स्थिरता राखण्यास मदत होईल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी रखडलेली कामे पूर्ण करण्याचा काळ ठरू शकतो. मेहनतीमुळे नवीन संधी मिळू शकतात. मात्र, अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे संयम राखून प्रयत्न सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.