Dhanadhya Yog saam tv
राशिभविष्य

Dhanadhya Yog: 30 वर्षांनंतर शुक्र-शनीमुळे तयार होणार धनाढ्य योग; 'या' राशींवर होणार सुखाची बरसात, बक्कळ पैसाही मिळणार

Shani And Shukra Made Dhanadhya Yog: २९ मार्च रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे धनाढ्य योग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एका राशीत दोन ग्रहांच्या प्रवेशाने त्यांची युती होते. ग्रहांच्या या युतीमुळे अनेकदा खास राजयोगांची निर्मिती होते. या राजयोगांचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होत असतो. येत्या काळात असाच एक राजयोग तयार होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, संपत्ती आणि समृद्धीचा कर्ता शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशी मीन राशीत भ्रमण करणार आहे. तर २९ मार्च रोजी शनिदेव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्यामुळे धनाढ्य योग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मिथुन राशी

धनाढ्य योगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या वेळी तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना परदेशी कंपन्यांसोबत काम करण्याच्या ऑफर मिळू शकतात. जर विद्यार्थ्यांना सध्या त्यांच्या करिअरबाबत काही अडचणी असतील तर त्या लवकर दूर होऊ शकतात.

वृषभ रास

धनाढ्य योगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण शनि आणि शुक्र यांचा हा युती तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात तयार होणार आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. जुनी कुठे गुंतवणूक केली असेल, तर आता तुम्हाला त्यातून नफा मिळू शकणार आहे. आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत.

कुंभ रास

धनाढ्य योगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. कारण हे संयोजन तुमच्या राशीच्या धन आणि वाणी स्थानावर तयार होणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारू शकणार आहे. या काळात तुमचा संवाद सुधारणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT