Chaturgrahi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Chaturgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार चतुर्ग्रही योग; 'या' 3 राशींसाठी सुवर्णसंधी, शनी-शुक्राची राहणार कृपा

Chaturgrahi Yog In Meen: ग्रहांच्या या शुभ संयोगामुळे काही राशींसाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच चांगले दिवस सुरू होणार आहेत. या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्यावेळी एका राशीमध्ये चार ग्रहांचा संगम होतो तेव्हा त्याला चतुर्ग्रही राजयोग म्हटलं जातं. ज्योतिष्य शास्त्रानुसार, ठराविक अंतराने ग्रहांचया गोचरमुळे एका राशीत अशी परिस्थिती निर्माण होते. ग्रह एका विशिष्ट अंतराने त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार करणार आहे. येत्या काळान मीन राशीमध्ये चतुर्ग्रही राजयोग तयार होणार आहे.

चंद्र, राहू, बुध आणि शुक्र मीन राशीत एकत्र भ्रमण करणार आहेत. यामुळे मीन राशीत चतुर्ग्रही राजयोग निर्माण होणार आहे. यासोबतच, मार्च महिन्याच्या सुरुवातीला बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. ग्रहांच्या या शुभ संयोगामुळे काही राशींसाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच चांगले दिवस सुरू होणार आहेत. या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. व्यापारी आणि नोकरी करणाऱ्या दोघांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कोणत्याही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यापारी वर्ग काही मोठे व्यावसायिक सौदे करू शकतात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीच्या कर्मभावावर तयार होणार आहे. या काळात व्यापारी वर्गातील लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

कर्क रास

चतुर्ग्रही योगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. तुमचं नशीब चमकू शकणार आहे. या काळात, तुम्ही तुमचे सर्व काम पूर्ण कराल जे तुम्हाला खूप दिवसांपासून करण्याचा त्रास होत होता. तुमचा अध्यात्माकडे कलही जास्त असणार आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT