Budh Rahu Yuti 2025 saam tv
राशिभविष्य

Rahu Budh Yuti: 18 वर्षांनंतर राहू आणि बुध ग्रहांचं दुर्लभ संयोग; 'या' राशींना मिळणार नवी नोकरी आणि पैसा

Rahu Budh Yuti Effects 2026: १८ वर्षांनंतर राहू आणि बुध यांचा दुर्मिळ ग्रहसंयोग होत आहे. या ग्रहस्थितीमुळे काही राशींना नोकरीच्या नवीन संधी मिळतील तसेच आर्थिक लाभ होणार आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा बुद्धी, तर्कशक्ती, संवाद, गणित यांचा कारक मानला जातो. तर राहू ग्रह कठोर वाणी, जुगार, प्रवास, चोरी, दुष्ट कर्म, त्वचेचे आजार, धार्मिक यात्रांचा कारक मानला जातो. राहू आणि बुध यांचा संयोग वर्ष २०२६ च्या सुरुवातीला होणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, हा संयोग तब्बल १८ वर्षांनंतर कुंभ राशीत तयार होणार आहे. या युतीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. तसंच या लोकांना शेअर बाजार आणि लॉटरीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी राहू–बुध युती लाभदायक ठरू शकणार आहे. कारण हा संयोग तुमच्या राशीपासून ११व्या स्थानावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फळ या काळात चांगले मिळेल.

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृष राशीच्या लोकांसाठी राहू–बुध युती लाभदायक ठरू शकणार आहे. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीतील कर्मस्थानात तयार होणार आहे. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग निर्माण होतील. करिअर आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम संधी मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील.

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी राहू–बुध युती लाभदायक ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. धनवृद्धीचे योग तयार होणार आहेत. व्यापाऱ्यांना अडकलेले पैसे परत मिळतील. करिअरमध्ये अचानक उंची मिळेल आणि नवे अवसर पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

Trending Saree Designs: पेस्टल ते मेटॅलिक, टिश्यू सिल्क साड्यांचे 'हे' आहेत ५ लेटेस्ट पॅटर्न; केवळ लग्नासाठीच नाही तर ऑफिससाठीही नक्की ट्राय करा!

SCROLL FOR NEXT