Rahu Gochar 2025  saam tv
राशिभविष्य

Rahu Gochar 2025: पुढच्या वर्षी राहू माजवणार हाहाकार; नात्यात वाद वाढणार, 'या' राशींनी राहावं सांभाळून

Rahu Gochar 2025: वैदिक ज्योतिषात राहुला भ्रामक ग्रह म्हटलं असून राहु ज्या घरात बसतो किंवा ज्या ग्रहासोबत असतो त्यानुसार त्याचे परिणाम दिसून येतात.

Surabhi Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये राहू ग्रहाला पापी ग्रह मानलं जातं. पुढच्या वर्षी राहू ग्रह गोचर करणार आहे. यावेळी मे महिन्यात राहू ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत जाणार आहे. राहू उग्र असून त्याता नकारात्मक प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पडताना दिसतो.

वैदिक ज्योतिषानुसार, 18 मे 2025 रोजी राहू मीन राशीला सोडून कुंभ राशीत जाणार आहे. वैदिक ज्योतिषात राहुला भ्रामक ग्रह म्हटलं असून राहु ज्या घरात बसतो किंवा ज्या ग्रहासोबत असतो त्यानुसार त्याचे परिणाम दिसून येतात. राहूच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कर्क रास

राहूचं गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी नकारात्मक परिणाम देणार आहे. पैशांचा खर्च वाढू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत वाद होण्याची शक्यता आहे. राहू कर्क राशीच्या आठव्या भावातून प्रवेश करणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी राहु सप्तम भावातून जाणार आहे. राहुच्या गोचरमुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रत्येक कामात अपयश येऊ शकतं.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी राहु पाचव्या घरातून गोचर करणार आहे. राहूच्या गोचरमुळे मुलं आणि वडील यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमधून तुम्हाला तोटा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constitution Of India: भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये या महिलांनी दिलंय विशेष योगदान; वाचा

Dhule News : कचरा संकलन करणाऱ्या गाडीने बालकास चिरडले; धुळे शहरातील धक्कादायक घटना

Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाचा त्याग करणार नाही, भाजप आमदार आक्रमक

Maharashtra News Live Updates: दिलीप वळसे पाटील देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Makeup Tips: मेकअप ब्रशचे किती प्रकार असतात? जाणून घ्या, ते कसे वापरायचे

SCROLL FOR NEXT