Rahu Gochar Effect Saam Tv
राशिभविष्य

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

Horoscope May Month: हिंदू ज्योतिषशास्त्रात, राहु ग्रह हा रहस्ये आणि साहसी कृतींचा उलगडा करणारा मानला जातो. कुंडलीत राहूच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राहूच्या शुभ प्रभावामुळे माणूस दारिद्र्यातून बाहेर येत राजा बनू शकतो.

साम टिव्ही ब्युरो

हिंदू ज्योतिषशास्त्रात, राहु ग्रह हा रहस्ये आणि साहसी कृतींचा उलगडा करणारा मानला जातो. कुंडलीत राहूच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राहूच्या शुभ प्रभावामुळे माणूस दारिद्र्यातून बाहेर येत राजा बनू शकतो. राहू ग्रह एका राशीत सुमारे 18 महिने राहतो.

द्रीक पंचांग नुसार, राहुने 30 ऑक्टोबर 2024 रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे आणि 18 मे 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करेल. मीन राशीत राहु असल्यामुळे 2025 पर्यंत काही राशींना खूप शुभ परिणाम मिळतील. कोणत्या आहेत या राशी, हे जाणून घेऊ...

वृषभ

मीन राशीत राहु असल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना प्रचंड लाभ होईल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधात गोडवा राहील. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग निर्माण होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल. पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल.

सिंह

राहुचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. सुख-सुविधांनी युक्त जीवन जगाल. राहूच्या प्रभावामुळे नात्यात मधुरता वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

वृश्चिक

2025 पर्यंत राहू मीन राशीत राहून वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ फळ देईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. या कालावधीत केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देईल. पण विचार न करता कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका. पैशाचे चतुराईने व्यवस्थापन करा.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT