Budhaditya and Lakshmi Narayan Yog saam tv
राशिभविष्य

Budhaditya Raj Yog: 12 महिन्यांनी बुधाच्या राशीत बनणार पॉवरफुल योग; 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Budhaditya Raj Yog In Horoscope: वैदिक पंचांगानुसार, बुधादित्य राज योग मिथुन राशीत तयार होणार आहे. बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे याची निर्मिती होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये काही वेळा दोन ग्रहांच्या युतीमुळे राजयोगांची निर्मिती होत असते. यावेळी असंच येत्या काळात एका राजयोगाची निर्मिती होणार आहे.

जून म्हणजेच चालू महिन्यात १५ जून रोजी सूर्याच्या गोचरमुळे मिथुन राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग व्यवसायाचा कर्ता बुध आणि ग्रहांचा राजा सूर्यदेव यांच्या युतीने तयार होणार आहे. या प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. मात्र ३ राशी अशा आहेत ज्यांच्यावर याचा अधिक प्रभाव पडणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून सुरुवातीला तयार होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. या काळात तुमची लोकप्रियता सामाजिकदृष्ट्या वाढणार आहे. तुमचा नवीन लोकांशी संपर्क येणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी, बुधादित्य राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक माध्यम, लेखन किंवा कला क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांची प्रतिभा या काळात पाहण्यासारखी असणार आहे. तुम्हाला या वेळी काही चांगल्या बातम्या मिळू शकतात.

तूळ रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकणार आहे. तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. मोठी ध्येयं साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

SCROLL FOR NEXT