Trigrahi Yog 2025: saam tv
राशिभविष्य

Trigrahi Yog 2025: मीन राशीत बनणार पॉवरफुल 'त्रिग्रही योग'; 'या' राशी होणार कोट्याधीशांच्या मालक, होणार बंपर फायदा

Powerful Trigrahi Yoga Pisces : शनी देव २९ मार्चला त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, मीन राशीत आधीच सूर्य, शुक्र, बुध आणि राहू यांचा संयोग असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना खूप खास असणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ग्रहांमध्ये अनेक मोठे बदल दिसून येणार आहेत. ग्रहांच्या या बदलांचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होत असतो. येत्या काळात म्हणजेच २९ मार्चपासून मीन राशीत अनेक ग्रह एकत्र येणार आहेत.

२९ मार्च रोजी न्यायदेवता शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ सोडून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यावेळी सूर्य, शुक्र, बुध आणि राहू आधीच उपस्थित आहेत. परंतु या ग्रहांमध्ये शुक्र, राहू आणि मीन राशीची युती खूप महत्त्वाची मानली जाते. या तिन्ही ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. मीन राशीत या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना लाभ होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फायदेशीर ठरू शकणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत सुरू असलेले वाद संपणार आहेत. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला फायदे मिळू शकतात. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायातही खूप फायदे मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असेल तर उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात.

कुंभ रास

या राशीच्या दुसऱ्या घरात त्रिग्रही योग तयार होणार आहे. शनि मीन राशीत असल्याने, या राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनीच्या साडेसत्तीचा शेवटचा टप्पा चालू राहणार आहे. शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या जीवनातील आर्थिक संकट संपुष्टात येणार आहेत. तुमच्या काम करण्याच्या क्षमतेने तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. नोकरीत मोठे फायदे मिळू शकतात.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो. या राशींच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये ज्ञान आणि शिस्त यांचा मेळ बसणार आहे.कामाच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या कामाचे खूप कौतुक होऊ शकणार आहे. जीवनात येणाऱ्या अनेक समस्या सोडवता येणार आहेत. तुम्ही वडिलोपार्जित मालमत्तेचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करू शकता. भागीदारीत केलेल्या व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा विजयरथ सुसाट! मतदानाआधीच आणखी एका महापालिकेत पारडं झालं जड, नेमकं काय राजकारण घडलं?

Crime: लग्नाचं खोटं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार; प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, पोलिसाचं हैवानी कृत्य

Chavali Bhaji Recipe: अस्सल गावरान पद्धतीची चवळीची भाजी कशी बनवायची?

कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधी निकाल लागला; शिंदे गटाने उधळला विजयाचा गुलाल, ३ नगरसेवक बिनविरोध

Dementia Symptoms : मेंदूच्या नसा होतील खराब, डोळ्यात दिसतात हे बदल, वेळीच जाणून घ्या लक्षणं

SCROLL FOR NEXT