Vastu Tips saam tv
राशिभविष्य

Vastu Tips: घरात पैसा यावा म्हणून 'या' दिशेला लावा आरसा; चुकीच्या दिशेला असेल तर होतील विपरीत परिणाम

Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरात असणारी प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे याचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे घरातील आरसा कोणत्या बाजूला असावा हे पाहूया.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यासाठी महत्त्वाची वास्तू म्हणजे आपलं घर. आपल्या घरात ठेवलेली प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा ही असते. मात्र घरातील गोष्टींकडून ऊर्जा मिळण्यासाठी त्या गोष्टी योग्य त्या दिशेला ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे साकारत्मक ऊर्जा आणि शांती मिळते.

वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरात असणारी प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी असणं गरजेचं आहे याचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. आज आपण असंच वास्तू शास्त्रानुसार घरातील आरसा कोणत्या बाजूला असला पाहिजे.

घरातील आरसा कोणत्या बाजूला असावा?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, घरातील आरसा कोणत्या दिशेला आहे, याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. घरात आरसा ठेवताना तो उत्तर किंवा पूर्व दिशेला असणं योग्य आहे. कारण या दिशा सकारात्मक उर्जांचं केंद्र मानलं जातात. याशिवाय या दिशांना धनाची देवता कुबेराची दिशाही मानली जाते.

जर तुम्ही घरात आरसा लावत असला तर तो अशा दिशेला लावा जेणेकरून पाहणाऱ्याचा चेहरा उत्तर किंवा पूर्ण दिशेला असावा. जर चुकीच्या जागी आरसा लावलात तर तुमच्या घरात नकारात्मक परिणाम पडू शकतात. त्यामुळे आरसा लावताना वास्तूंच्या नियमांचं पालन करा.

घरात कोणत्या दिशेला लावू नये आरसा?

तुम्ही झोपत असलेल्या बेडसमोर कधीही आरसा नसावा. याचं कारण म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहणं शुभ मानलं जात नाही. आरसा पश्चिमेकडे किंवा दक्षिणाभिमुख भिंतीवर लावू नये. यामुळे घरात कलह निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरासमोर आरसा लावू नये.

कोणती काळजी घ्याल?

वास्तू शास्त्रानुसार, ज्यावेळी तुम्ही घरी आरसा लावाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे आरसा कधीही तुटलेला नसावा. यामुळे घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT