Panchak October 2024 saam tv
राशिभविष्य

Panchak October 2024: दसऱ्यानंतर सुरु झाला पंचक काळ; 'या' गोष्टी करणं जाणीवपूर्वक टाळा

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रामध्ये असे काही दिवस आहेत, ज्या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. मुळात या दिवशी शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. दसऱ्यानंतर पंचकला सुरुवात झाली आहे. पंचकचे पाच दिवस असे असतात, ज्या दिवशी ही शुभ कार्य केली जात नाही. ऑक्टोबरमधील पंचकबाबत आज आपण जाणून घेऊया.

कधी आहे पंचक २०२४

ऑक्टोबर महिन्यात दसऱ्याच्या दिवसानंतर पंचकला सुरुवात होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, १३ ऑक्टोबर दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी पंचकला सुरुवात झाली आहे. तर १७ ऑक्टोबर सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी हे पंचक संपणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या काळात शुभ काम करणं चांगलं मानलं जात नाही.

पंचक म्हणजे नेमकं काय?

पंचक हा हिंदू ज्योतिषशास्त्रातील एक विशेष काळ मानला जातो. शास्तानुसार हा काळ नक्षत्रांच्या संयोगाने तयार होतो. या पाच नक्षत्रांमध्ये घनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती यांचा समावेश असतो. ज्यावेळी चंद्र या पाच नक्षत्रांपैकी कोणत्याही नक्षत्रात असतो आणि कुंभ किंवा मीन राशीत असतो तेव्हा पंचकला सुरुवात होते.

पंचकमध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पंचकमध्ये शुभ कामं करू नयेत. मात्र या काळात कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घ्या.

  • ज्योतिषशास्त्रानुसार पंचक काळात लाकूड गोळा करणं किंवा खरेदी करणं टाळलं पाहिजे.

  • जर तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा नवीन घरी राहण्यास जात असाल तर पंचक सुरु असताना घरावर छत टाकू नका किंवा छताचं काम करू नका.

  • पलंग आणि खाट पंचकमध्ये चुकूनही बनवू नये. हे अत्यंत अशुभ मानलं जातं.

  • पंचक काळात तुम्ही कोणतीही नवी नोकरी धरू नये. किंवा नव्या ठिकाणी जाणंही टाळलं पाहिजे

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, अँजियोग्राफी होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : पोस्ट खात्यातील पैसे संपले; लाडक्या बहिणींना पहावी लागतेय वाट

Chanakya Niti: वयाच्या २० वर्षांनंतर 'या' चुका करूच नका; नाहीतर वाईट काळ सुरु झाला असं समजा

Pooja Khedkar : पूजा खेडकरचे वडील विधानसभा लढवणार, विखेंवर टीका करत घोषणा

Kacha Chivda: विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT