Malavya And Shash Rajyog On Dussehra saam tv
राशिभविष्य

दसऱ्याच्या दिवशी ‘या’ राशींची लागणार लॉटरी; आर्थिक प्रश्न मिटणार, करिअरमध्ये सुवर्णसंधी!

Malavya And Shash Rajyog On Dussehra: अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी दिवशी साजरी केली जाते. यंदाच्या दसऱ्याला ग्रहांची स्थिती अतिशय शुभ योग निर्माण करतेय.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण देशभरात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय. हिंदू पंचागानुसार, नऊ दिवसांच्या नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. याला विजया दशमी असं देखील म्हटलं जातं. हा सण ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने देखील दसरा फार महत्त्वाचा मानला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी दिवशी साजरी केली जाते.

धार्मिक मान्यताप्रमाणे, दसरा साजरा करण्याची दोन मुख्य कारणं आहे. यामध्ये पहिलं कारण म्हणजे भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला आणि दुसरा, महिषासुराशी दहा दिवसांच्या युद्धात माँ दुर्गाने त्याचा वध केला. यंदाच्या दसऱ्याला ग्रहांची स्थिती अतिशय शुभ योग निर्माण करतेय.

यंदाच्या वर्षी दसरा १२ ऑक्टोबर रोजी असून या दिवशी शुक्र तूळ राशीत राहणार आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. याचसोबत शनी त्याच्या कुंभ राशीत राहून शश राजयोग तयार होणार आहे. या दोन्ही राजयोगांच्या निर्मितीने काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी मालव्य योग आणि शश योग अतिशय शुभ ठरणार आहेत . या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकतं. या वेळी बेरोजगारांनाही नोकरी मिळू शकणार आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचं संबंध खूप चांगले होणार आहे. नशीब तुम्हाला सर्वत्र साथ देणार आहे. तुमचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरणार आहे.

मकर रास

यावेळी मालव्य आणि शश हे दोन्ही राजयोग मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं यश देऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. कुटुंबातील व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत. तुम्ही कामासाठी प्रवास करणार आहात. व्यावसायिकांनाही त्यांच्या कामात अनुकूल परिणाम मिळणार आहे.

तूळ रास

शुक्र तूळ राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होणार आहे. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करणार आहात. प्रेम संबंध सुरू असतील तर तुमचा विवाह होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT