Shani Uday saam tv
राशिभविष्य

Shani Uday: 6 एप्रिल रोजी पलटणार 'या' राशींचं नशीब; आकस्मिक धन लाभ होईल, नवी नोकरीही मिळण्याची शक्यता

Shani Uday 2025: २९ मार्चला शनि मीन राशीत संचार सुरू करेल. शनीच्या या उदयासह अनेक राशींच्या आयुष्यातील कठीण काळ दूर होणार आहे. शनीच्या प्रभावामुळे या कालावधीत काही राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायाचा देवता शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. याचं कारण तो एकमेव ग्रह आहे जो लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी सध्या कुंभ राशीत मावळतीच्या स्थितीत आहे. मात्र यावेळी ६ एप्रिल रोजी तो मीन राशीत उदयास येणार आहे.

२९ मार्च रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या उदयाबरोबरच अनेक राशींच्या जीवनातील अंधारही संपणार आहे. शनीच्या उदयामुळे काही राशींच्या व्यक्तींना या काळात फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

कधी होणार आहे शनीचा उदय?

शनी ६ एप्रिल रोजी सकाळी ५:०५ वाजता मीन राशीत उदय होणार आहे. तो २९ मार्च रोजी अस्त अवस्थेत मीन राशीत प्रवेश करेल.

वृश्चिक रास

या राशीच्या कुंडलीच्या तिसऱ्या आणि चौथ्या घराचा स्वामी शनि असल्याने, तो पाचव्या घरात भ्रमण करणार आहे. शनीचा उदय तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळवून देऊ शकणार आहे. मोठ्या आर्थिक लाभाचीही संधी देऊ शकणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. आयुष्यात काही आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे.

मकर रास

या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. या राशीच्या लोकांच्या संवाद कौशल्यात वाढ होणार आहे. या काळात आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. तुमचं भाषण देखील खूप प्रभावी असणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असू शकते.

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठीही शनीचा उदय भाग्यवान ठरू शकणार आहे. या राशीच्या कुंडलीत, चौथ्या आणि पाचव्या घराचा स्वामी शनी सहाव्या घरात उदय होणार आहे. कुटुंबाची संयुक्त मालमत्ता वाढवू शकणार आहे. यावेळी संवाद कौशल्ये देखील सुधारू शकणार आहेत. धैर्य आणि दृढनिश्चय वेगाने वाढू शकतो. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT