Guru Gochar 2025 Jupiter Planet saam tv
राशिभविष्य

Guru Gochar: 14 मे रोजी 'या' राशींचं भाग्य चमकणार; गुरु ग्रहाच्या गोचरमुळे येणार सोन्याचे दिवस, हाती येणार पैसा

Guru Gochar 2025 Jupiter Planet Transit In Mithun: वैदिक ज्योतिषानुसार, गुरु हा ग्रह मे महिन्यात मिथुन राशीत संचार करणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी सुखद काळाची सुरुवात होऊ शकते. यात काही राशींच्या लोकांना फायदे मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह सुमारे १३ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. त्यामुळे एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला १२ वर्षे लागतात. गुरू सध्या वृषभ राशीत भ्रमण करतोय. येत्या काळात गुरु ग्रह गोचर करणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, गुरु ग्रह मे महिन्यात मिथुन राशीत भ्रमण करणार आहे. ज्यामुळे काही राशींसाठी सुवर्णकाळ सुरू होऊ शकणार आहे. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे. अविवाहित व्यक्तींना याचा अधिक फायदा होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

गुरु ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. गुरु गुरू तुमच्या राशीतून लग्नाच्या घरात संक्रमण करणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येणार आहे. या काळात सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ रास

गुरु ग्रहाने राशीत केलेला बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या वेळी तुमचे भाग्य वाढू शकणार आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता. तुमच्या करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळणार आहेत. या काळात व्यापारी वर्गातील लोक त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात.

वृषभ रास

गुरु ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकणार आहे. गुरु ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या स्थानात संक्रमण करणार आहे. यावेळी तुमच्या पैशाच्या आवकासाठी नवीन मार्ग तयार केले जाणार आहेत. कामात येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT