Guru Vakri saam tv
राशिभविष्य

Guru Vakri 2024: ऑक्टोबर महिन्यात गुरु चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Guru Gochar 2024: नवरात्रीच्या काळात गुरु ग्रह त्याच्या स्थितीत बदल करणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा विपरीत परिणाम दिसून येणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. हे ग्रहांचं गोचर असून काही ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये देखील बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्ग्रस्थ होतात. येत्या काळात नऊ ग्रहांपैकी गुरु ग्रह उलटी चाल चाणार आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, नवरात्रीच्या काळात गुरु ग्रह त्याच्या स्थितीत बदल करणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह वृषभ राशीमध्ये उल्टी चाल चालणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा विपरीत परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास (Aquarius)

गुरु ग्रहाची वक्री चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी समस्या वाढवू शकणार आहे. या काळात तुमचा खर्च वाढणार आहे. या काळात न्यायालयाचा निर्णय तुमच्या विरोधात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकते. नशीब सुद्धा साथ देणार नाही.

धनु रास (Sagittarius)

गुरु ग्रहाची उलटी चाल धनु राशीसाठी शुभ ठरणार नाही. आर्थिक बाबतीतही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव झपाट्याने वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये वाद होऊ शकतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही कामात अजिबात बेफिकीर राहू नका. कोणाचीही फसवणूक करू नका आणि योग्य व्यक्तीचे समर्थन करा. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पावसामुळे झेंडू फुलांची आवक घटली, दर मात्र वाढले

Trending Blouse Designs For Women: दसऱ्यानिमित्त महिलांनी करा खास पारंपारिक पोशाख, हे आहेत ट्रेंडी ब्लाऊजचे पॅटर्न्स

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

Thursday Horoscope: वाईट काळ संपला ! दसऱ्यापासून ‘या’ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Consumer Awareness : नियम पाळले नाहीत, कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी; अन्न औषध प्रशासनाची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT