Numerology secrets about people with birth numbers 3 and 5 saam tv
राशिभविष्य

बडबड्या वृत्तीचे असतात 'ही' लोकं; गावभर करतात बोंबाबोंब, चुकूनही सांगू नका तुमची खासगी गोष्ट

Numerology : एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व त्यांच्या जन्मतारखेवरून समजू शकते. काही लोक आपल्या गोष्टी गुप्त ठेवण्यात पटाईत असले, तरी विशिष्ट मूलांक असलेल्या इतरांशी गप्पा करताना थोडी खबरदारी घेणे आवश्यक असतं.

Bharat Jadhav

जर तुम्ही तुमच्या मनाच्या अगदी जवळची एखादी गोष्ट किंवा एखादे वैयक्तिक गुपित कोणाशी तरी शेअर करण्याचा विचार करत असाल, तर आधी त्यांचा 'मूलांक' जाणून घ्या. अंकशास्त्रानुसार, ज्यांचा मूलांक ३ किंवा ५ आहे, अशा व्यक्तींशी सीक्रेट शेअर करताना थोडी खबरदारी बाळगली पाहिजे.

मूलांक ३ असलेल्या व्यक्तींबाबत सावध व्हा

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ३ असतो. अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ चा स्वामी ग्रह 'गुरु' (ज्युपिटर) हा आहे. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती साधारणपणे मोकळ्या मनाच्या आणि मिळूनमिसळून वागणाऱ्या असतात. त्यांना नवीन लोकांशी संवाद साधायला आवडतो. आपले विचार इतरांसोबत मांडायला आवडत असतात. कधीकधी गप्पा त्या इतक्या मोकळेपणाने करतात की, समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक गोष्टींवरही चर्चा करू लागतात.

मुलांक ३ असलेल्या व्यक्ती मुद्दामहून कोणाचीही सीक्रेट उघड करत नाहीत, तरीही त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे कधीकधी खाजगी माहिती सर्वत्र पसरू शकते. अनेकदा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना किंवा सामान्य चर्चेदरम्यान, ते नकळतपणे स्वतःच्या किंवा इतरांच्या खासगी गोष्टी बोलून बसतात.

ज्यांचा मूलांक ५ आहे, अशा व्यक्ती माहिती आणि विचार इतरांशी वाटून घेण्यास उत्सुक असतात. महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ५ मानला जातो. अंकशास्त्रानुसार, या अंकावर बुध ग्रहाचे अधिपत्य असते. बुध ग्रहाचा संबंध संभाषण, बुद्धिमत्ता आणि संवाद यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे मूलांक ५ असलेल्या व्यक्ती उत्तम चर्चा करणारे आणि अत्यंत मिळूनमिसळून वागणाऱ्या असतात असे मानले जाते. त्यांना नवीन लोकांना भेटायला आणि विविध विषयांवर चर्चा करायला आवडते.

अनेकदा हीच सवय त्यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरते. संभाषण सुरू असताना, ते नकळतपणे एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसमोर काहीतरी बोलून बसतता. जेव्हा चर्चा अत्यंत रंजक किंवा उत्कंठावर्धक असते, तेव्हा एखादी खासगी बाब त्यांच्याकडून चुकून उघड होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ते घातक ठरतात. त्यामुळे या मूलांक असलेल्या व्यक्तींशी वैयक्तिक गोष्टी शेअर न करणेच उत्तम असते. परंतु तुम्हाला माहितीये का, या मूलांकांच्या व्यक्ती चांगल्या मित्र-मैत्रिणी बनू शकतात.

टीप: या लेखात नमूद केलेले उपाय, फायदे, सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. साम टीव्ही या लेखातील मजकुराचे समर्थन करत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई शहरातील सुमारे ६०० आंदोलकांची सुटका, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू

Chaniya Choli Designs: गरबा नाईटमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील! ट्राय करा हे ७ चनिया चोळी डिझाइन्स

महायुतीवर संकट; फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याविरोधात मराठा शक्ती एकवटली; थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी

Navratri Puja Vidhi: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते? जाणून घ्या

राज ठाकरेंचा मोदी-शाह यांना थेट इशारा; म्हणाले, जनता माज उतरवणार नाही असं वाटतंय का?'

SCROLL FOR NEXT