अंक ज्योतिषानुसार काही विशिष्ट तारखांना जन्मलेले लोक बोलण्यात जादूगार असतात
हे लोक शब्दांनी कोणालाही सहज पटवून देऊ शकतात
त्यांच्यात आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि संवादकौशल्य प्रखर असतं
अंकशास्त्र हे जीवनाच्या व्यावहारिक पैलूंशी फार पूर्वीपासून जोडलेले आहे. जन्मतारखेच्या अंकांपासून तयार होणारा मुलांक संख्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि बोलण्याच्या पद्धतींवर प्रभाव पाडत असतो. तीन तारखांना जन्मलेले लोक शब्दांच्या शक्तीचा प्रभावीपणे वापर करतात. असे लोक त्यांचे विचार व्यक्त करून इतरांवर सहजपणे प्रभाव टाकत असतात. या लोकांना शब्दांचा जादूगर देखील म्हटलं जातं.
कोणत्याही महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ५ असतो. या मुलांकाचा स्वामी ग्रह बुध आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद आणि समजुतीला प्रोत्साहन देतो. म्हणूनच ५ मुलांकाचे लोक त्यांच्या तीक्ष्ण मन आणि चपळ विचारसरणीसाठी ओळखले जातात.
५ मुलांक असलेले लोक संवादाचा वापर प्रभावी साधन म्हणून करतात. हे लोक जड शब्दांऐवजी सोपी आणि स्पष्ट भाषा निवडतात. ते दुसऱ्या व्यक्तीच्या गरजा समजून घेतात आणि त्यांना आवश्यक माहिती देतात. त्याच्या या शैलीमुळे इतर लोक त्यांच्याशी आपला संपर्क वाढवत असतात. त्यांच्याशी लवकर जोडले जातात. ५ मुलांक असलेले लोक बऱ्याचदा कोणताही दबाव न आणता, हे लोक केवळ तर्क आणि गोड शब्दांनी आपले उद्दिष्ट साध्य करतात.
हे लोक मोकळे आणि मन मिळावू असतात. त्यांना नवीन लोकांशी संवाद साधणे सोपे वाटते. ते गर्दीतून वेगळे दिसण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाहीत. त्यांचे सामान्य वर्तन आणि चंचल बुद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य असते. हा गुण त्यांना मैत्री, काम आणि नातेसंबंधांमध्ये भरभराट करण्यास मदत करत असते.
५ मुलांक असलेले लोक विक्री, माध्यम, विपणन, लेखन, शिक्षण आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात चांगले काम करतात. जिथे मन वळवणे आणि संवाद आवश्यक असतो, तिथे हे लोक स्वतःला लवकर सेट करतात. त्यांचे विचार व्यक्त करण्याची त्यांची क्षमता त्यांना गर्दीपासून वेगळे करते. त्यांची वेगळी ओखळ निर्माण करते.
प्रत्येक गुण एका कमकुवतपणाशी संबंधित असतो. ५ मुलांक असलेले लोक सहसा सहज कंटाळतात. परत परत मन बदलण्याची प्रवृत्तीमुळे अनेक कामे अपूर्ण ठेव असतात. समोरच्या व्यक्तीचे पूर्णपणे ऐकल्याशिवाय निर्णय घेणे त्यांच्यासाठी हानिकारक ठरत असते. ही सवय नातेसंबंधांवर आणि संधींवर परिणाम करणार असते.
जर ५ मुलाक असलेले लोक संयम आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित केलं तर त्यांचे संवाद कौशल्य अधिक मजबूत होत असते. ऐकण्याची सवय आणि विचारांवर नियंत्रण यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आणखी वाढू शकते. मग, बोलणे केवळ कामे पूर्ण करण्याचे साधन राहत नाही तर विश्वास निर्माण करण्याचे साधन बनत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.