NUMEROLOGY yandex
राशिभविष्य

Numerology: 'या' मूलांकाचे लोक असताना प्रतिभावान; 'जे लाथ मारतात तेथे काढतात पाणी', संधीचं करतात सोनं

Numerology : अंकशास्त्रानुसार ६, १५ किंवा २४ तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर शुक्राचे अधिपत्य असते. त्यांची व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, यशाची रहस्ये आणि ते प्रत्येक संधीचे संपत्ती व प्रगतीमध्ये कसे रूपांतर करतात, हे जाणून घ्या.

Bharat Jadhav

या मूलांकाचे लोकांवर शुक्र ग्रहाच्या आशीर्वाद असतो. शुक्र ग्रहाच्या कृपेमुळे धन आणि समृद्धी मिळत असते. हे जे काही काम हाती घेतात, त्यात त्यांना प्रचंड यश मिळते. हे लोक मिळेल त्या संधीचं सुवर्ण करतात. लाथ मारतील तेथे पाणी काढण्याची ताकद यांच्यात असते. ते जे काही करतात त्यात पारंगत असतात, ज्यामुळे ते अजिंक्य बनतात. ६, १५ आणि २४ या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा ६ असतो. चला तर मग जाणून घेऊया की हा मूलांक असलेले लोक कसे असतात.

उत्साही असतात

हा मुलांक असलेले लोक उत्साही असतात. मुलांक ६ असलेले लोक खूप उत्साही असतात. ते न थकता दीर्घकाळ काम करू शकतात. ते त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात एक अनोखा उत्साह आणि चैतन्य टिकवून ठेवतात.

आकर्षक

शुक्र ग्रह ६ या अंकाचा स्वामी आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा ग्रह सौंदर्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच ज्यांचा मुलांक ६ असतो, ते खूप आकर्षक दिसतात. त्यांना पाहून तुम्ही त्यांच्या खऱ्या वयाचा अचूक अंदाज लावू शकत नाही, कारण ते त्यांच्या वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात.

चुंबकीय व्यक्तिमत्व आणि मेहनती

या मुलांकाच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी आणि चुंबकीय असते. हे लोक जिथे जातात तिथे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. लोक त्यांच्या शैलीने मोहित होतात. ज्यांचा मुलांक ६ असतो, ते अत्यंत मेहनती आणि बुद्धिमान असतात. या दोन गुणांमुळे ते सहजपणे शून्यातून शिखरापर्यंत मजल मारू शकतात. संपत्ती आणि समृद्धी त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या येतात.

नाते जपतात

ज्यांचा मुलांक ६ असतो, ते त्यांच्या नात्यांप्रती समर्पित असतात. ते स्वभावाने खूप रोमँटिक आणि काळजी घेणारे असतात. ते आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी काहीही करू शकतात. ते उत्कृष्ट जीवनसाथी बनतात. मुलांक ६ असलेल्या लोकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जे काही काम करतात ते उत्कृष्ट पद्धतीने करतात. ते ज्या क्षेत्रात काम करतात, त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचतात. ते जगाची पर्वा न करता आपल्या अटींवर आयुष्य जगतात आणि आपली स्वप्ने साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT