Gajkesri Yog 2025 Rashifal saam tv
राशिभविष्य

Gajkesri Yog: पुढच्या वर्षी गुरु-चंद्राच्या युतीने बनणार खास राजयोग; 'या' राशींचा बँक बॅलन्स वाढणार, लग्नातील अडथळेही दूर होणार

Gajkesri Yog 2025 Rashifal: ज्योतिष शास्त्रानुसार 2025 मध्ये गुरूचा चंद्राशी युती होणार आहे. या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे याची माहिती घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष हे ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने फार महत्त्वाचं मानलं जातंय. ज्योतिष शास्त्रानुसार 2025 मध्ये गुरूची चंद्राशी युती होणार आहे. या युतीमुळे गजकेसरी योग तयार होईल. हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. 28 मे 2025 रोजी 12 वर्षांनी गजकेसरी योग तयार होणार आहे.

ज्योतिष्य पंचांगनुसार, 14 मे रोजी गुरू वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 28 मे रोजी दुपारी 1:36 वाजता चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि चंद्राच्या संयोगाने तयार झालेला गजकेसरी योग काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे याची माहिती घेऊया.

मिथुन रास

ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगलं असणार आहे. या वर्षी तुमच्या आर्थिक अडचणी कमी होणार आहेत. या राशीच्या लोकांना 2025 मध्ये नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ आणि कर्जमुक्ती मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबात सुख-शांती नांदणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना या योगाचा विशेष फायदा होणार आहे. परदेशात शिकण्याची किंवा नोकरी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी वेळ चांगला राहणार आहे. जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. धार्मिक प्रवासाची संधी मिळू शकणार आहे. कौटुंबिक व्यवसायात लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी हा योग अतिशय शुभ राहणार आहे. आर्थिक लाभ होईल आणि संतती सुखी होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रुची वाढणार आहे. वडील आणि सासरचे सहकार्य मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरीत पगार वाढण्याची आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT