Laxmi Narayan Raj Yog saam tv
राशिभविष्य

Laxmi Narayan Rajyog: 50 वर्षांनंतर बनणार नवपंचम-लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Lakshmi Narayan Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीतील बदल मानवी जीवनात मोठे बदल घडवून आणतात. 'नवपंचम लक्ष्मी नारायण योग' हा एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग मानला जातो. हा योग बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या नवपंचम स्थितीमुळे तयार होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ आणि राजयोगांचं वर्णन करण्यात आलं आहे. या योगांचा प्रभाव ज्या लोकांच्या कुंडलीत असतो, त्यांना जीवनात भौतिक सुख, पैसा आणि यश मिळतं. सध्या बुध ग्रह कर्क राशीत येणार असून येत्या २१ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रहही कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे कर्क राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. याचसोबत मंगळ आणि शनी हे नवपंचम योग तयार करणार आहेत. या योगांचा परिणाम म्हणून काही राशींना अचानक धनलाभ होण्याची आणि भाग्य उगम होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

तूळ रास

तूळ राशीसाठी लक्ष्मी नारायण आणि नवपंचम योग अतिशय शुभ सिद्ध होऊ शकणार आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकणार आहे. नवीन भागीदारीचे प्रस्ताव येणार आहेत. याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळणार आहे. नातेसंबंध सौहार्दपूर्ण राहतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठीही हे योग फायदेशीर ठरू शकणार आहेत. कारण हे योग त्यांच्या कुंडलीत सहाव्या स्थानात तयार होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. करिअरमध्ये नवीन उपलब्धी मिळू शकेल. उपलब्ध संधी ओळखून त्याचा योग्य फायदा घेता येईल.

कर्क रास

कर्क राशीसाठी लक्ष्मी नारायण आणि नवपंचम योग फारच प्रभावशाली ठरतील. कारण हे योग लग्नस्थानी, म्हणजेच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या स्थानात तयार होत आहेत. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आत्मविश्वास वाढणार आहे. समाजात मान-सन्मान मिळणार आहे. करिअरमध्ये नवीन सुरुवात होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Off Air : शिवानी सुर्वेच्या 'थोडं तुझं आणि ...' नंतर 'ही' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, एक वर्षातच गाशा गुंडाळला

Realme 15T 5G Launched: 7000mAh बॅटरीसह कमी किमतीत दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि ऑफर

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील संभाजीनगरच्या गॅलॅक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

GST Council: जीएसटी कौन्सिलची आज बैठक! कपडे, शूजपासून ते कारपर्यंत कोणत्या गोष्टी स्वस्त होणार?

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, नंतर UPSC केली क्रॅक; निर्भीड IPS ऑफिसर विकास वैभव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT