Bhagyank 5 in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Bhagyank 5 in Marathi : तुमचा जन्म ५,१४,२३ या तारखांना झालाय का? मग तुम्ही आहात खूपच नशिबवान, वाचा...

Numerology 5 Personality : ज्यांचा जन्म महिन्याच्या कोणत्याही ५,१४,२३ या तारखांना झाला आहे, त्यांचा भाग्यांक पाच आहे.

Anjali Potdar

ज्यांचा जन्म कोणत्याही तारखेच्या ५,१४,२३ या तारखेला झाला आहे त्यांचा भाग्यांक ५ आहे. हे लोक पाच अंकाच्या अधिपत्याखाली येतात. बुध या ग्रहाचा अंमल आहे. त्यामुळे हे लोक हुशार, तल्लख, शास्त्राची आवड असणारे, व्यापारीवृत्ती, झटपट काम करणारे असतात. कल्पना आणि व्यवहारचातुर्य वाखाण्याजोगे असते. कुशल बुद्धी आणि कृती सुद्धा चांगली असते. खेळ आवडतात. स्वतःचे विचार दुसऱ्याला समजून सांगण्याची आवड असते. हातातील कार्यात यश कसे मिळवायचे आणि पूर्वनियोजित काम कसे करावे हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे. गुढविद्येची आवड असते. व्यक्तिमत्व प्रसन्न असून आळशीपणा अजिबात आवडत नाही. समाजप्रिय व्यक्ती असतात.

नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. कोणत्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुमचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. तुमच्या मनात काही वेळा नाही नैराश्य येते. त्यामुळे अस्वस्थता असतो. पण एकूण दृष्टिकोन विशाल असतो. जीवनाकडे संयमाने पाहता. साहचरीवृत्ती, सातत्य, तीव्रबुद्धिमत्ता असते, दुसऱ्याला मदत करण्याची हौस आहे. पण आपला कोणी गैरफायदा घेणार नाही ना? याचेकडे लक्ष ठेवा. धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयांमध्ये गोडी असते. दिसायला चांगले आणि लोकप्रिय असतात. दुसऱ्याला सहकार्य करणे आवडते. खूप बडबड केलेली यांना आवडत नाही. वैवाहिक जीवन चांगले असते. मुले होण्याबाबत आणि प्रकृती बाबत थोडासा त्रास संभवतो. पैशाच्या बाबतीत नशीबवान असतात. शब्द आणि कृती याच्यामध्ये ठामपणा येतो.

नोकरी व्यवसायाचा विचार केला तर अनेक तऱ्हेचे व्यवसाय उपलब्ध आहेत. तुमचा व्यवसाय नक्की कुठला हे सांगायला अवघड आहे. कारण तुम्ही versatile person आहात. तुमचा कल बघताना बँकिंग क्षेत्र, मार्गदर्शनाची क्षेत्रे, councelling , कम्युनिकेशन यांमध्ये तुम्ही चमकु शकता. व्यापार आणि व्यवसाय उदिम या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. फिरतीचे व्यवसाय, एजंट, दुकाने हे तुम्हाला योग्य ठरू शकते.

रोग आजाराचा विचार केला तर- पित्त प्रकृती, पित्ताशयावर अंमल, मानसिक असंतुलन, मानसिक त्रास, पोटाचे आजार, मज्जातंतू, मान, कान, हात आणि श्वसन क्रियेवर ५ या अंकाचा अंमल दिसून येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

Laxman Hake: ओबीसींच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन|VIDEO

Money Plant: मनी प्लांट पाण्यात की मातीत लावावे, काय फायदेशीर?

Raigad Crime News : अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध, गर्भवती असल्याचं कळताच बालविवाह; रायगडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT