Today's lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Zodiac financial success: चंद्र मीन राशीत! आज ४ राशींना मिळणार अनपेक्षित यश आणि आर्थिक फायदा

zodiac signs financial luck today: आज चंद्र मीन राशीत प्रवेश करत आहे आणि त्यामुळे काही राशींच्या लोकांना अनपेक्षित यश तसेच आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज यंदाच्या वर्षीच्या शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस आहे. आजचा दिवस मानसिक एकाग्रता, संयम आणि सूक्ष्म नियोजनासाठी उत्तम मानला जातो. शुक्ल एकादशीची पुण्यमयी तिथी असल्याने धार्मिक कार्य, व्रत आणि दानधर्मासाठी विशेष शुभ मानण्यात येते.

चंद्र मीन राशीत भ्रमण करत असल्याने भावनिक स्थैर्य, सृजनशीलता आणि आध्यात्मिक विचारांना चालना मिळणारा दिवस आहे.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल एकादशी

  • नक्षत्र: रेवती

  • करण: वणिज

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: व्यतिपात (02 डिसेंबर, 12:59:36 AM पर्यंत)

  • वार: सोमवार

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 06:47:33 AM

  • सूर्यास्त: 05:24:52 PM

  • चंद्रोदय: 02:21:04 PM

  • चंद्रास्त: 02:29:17 AM

  • चंद्रराशी: मीन

  • ऋतु: हेमंत

हिंदू मास व वर्ष

  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पूर्णिमान्त): मृगशिरा

अशुभ मुहूर्त

  • राहुकाल: 08:07:13 AM ते 09:26:53 AM

  • यमघंट: 10:46:33 AM ते 12:06:13 PM

  • गुलिकाल: 01:25:53 PM ते 02:45:33 PM

शुभ मुहूर्त

  • अभिजित मुहूर्त: 11:45:00 AM ते 12:27:00 PM

आज कोणत्या चार राशींना दिवस उत्तम?

कर्क

कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आज सकारात्मक ठरणार आहेत. आर्थिक बाबींमध्ये स्थैर्य येणार आहे. कामात वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

कामाच्या ठिकाणी नवी संधी मिळण्याचे योग आहेत. या काळात तुमची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळणार आहे. तुमच्या कठीण काळात कुटुंबियांची साथ मिळणार आहे.

धनु

नवीन योजना आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रवास किंवा कामाशी संबंधित हालचालींना यश मिळेल. तुम्हाला अचानक चांगल्या ठिकाणाहून पैसा मिळू शकतो.

मीन

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आज मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढेल. आध्यात्मिक कृती, ध्यान किंवा शांत चिंतनासाठी उत्तम दिवस मानला जातो. नात्यात काही समस्या असतील तर त्या सुटतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT