Guru Nakshatra Gochar Saam Tv
राशिभविष्य

Mercury Vakri In Tula: 10 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; 12 महिन्यांनी बुध ग्रह होणार वक्री

Mercury Retrograde November 10 lucky zodiac: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह हा दरवर्षी तीन ते चार वेळा वक्री चाल करतो. सुमारे १२ महिन्यांच्या कालावधीनंतर, १० नोव्हेंबर २०२५ रोजी बुध ग्रह पुन्हा एकदा तूळ राशीत वक्री होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक कालावधीनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह हे वक्री आणि मार्गी देखील होतात. ग्रहांच्या या चालींचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर काही ना काही होत असतो.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, येत्या १० नोव्हेंबरपासून बुध ग्रह तूळ राशीत वक्री होणार आहे. बुध ग्रह वक्री स्थितीत असताना अधिक प्रभावी फळ देतो. या गोचराचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी तीन राशींसाठी हा काळ विशेष शुभ ठरणार आहे. या राशींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाची वक्री चाल अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. कारण बुध ग्रह या राशीच्या कर्म भावात वक्री होणार आहे. यावेळी कामकाजाच्या क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन संधी समोर येणार आहेत. कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरही तुमची ओळख आणि मान-सन्मान वाढणार आहे.

कुंभ राशी (Aquarius)

कुंभ राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाची उलटी चाल शुभ फलदायी ठरू शकणार आहे. या काळात नशिबाचा साथ मिळू शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. यावेळी तुम्हाला वरिष्ठांची साथ सहकार्य लाभणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील आणि एखादी शुभ बातमी ऐकायला मिळेल.

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाची वक्री स्थिती अत्यंत सकारात्मक ठरू शकणार आहे. बुध ग्रह या राशीच्या धन भावात वक्री होणार आहे. आकस्मिक धनलाभाचे योग तयार होणार आहे. बँकिंग आणि संवादाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुमच्या घरात पैशांची आवक वाढणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama: अशोक मामांच्या मालिकेत निवेदिता सराफांची एन्ट्री; २० वर्षांनंतर करणार एकत्र काम, पाहा पहिला प्रोमो…

Maharashtra Live News Update: सरकार सडलेला गहू आणि किडलेले तांदूळ शेतकऱ्यांना देतंय - उद्धव ठाकरे

Kidney Health: किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

SCROLL FOR NEXT