Sunday Horoscope In Marathi  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर पडणार, धनलाभ होणार; ५ राशींच्या लोकांना कमाईचा नवा मार्ग मिळणार

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी पडणार आहे. तर काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,२९ सप्टेंबर २०२५,अश्विन शुक्लपक्ष,महालक्ष्मी

पूजन(घागरी फुंकणे),त्रिरात्रोत्सवारंभ.

तिथी-सप्तमी १६|३२

रास-धनु

नक्षत्र-मूळ

योग-सौभाग्य

करण-वणिज

दिनविशेष-१७ प. चांगला

मेष - कामानिमित्त काहींना प्रवास होतील. मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभणारा असा आजचा दिवस आहे. धाडसाने नव्या गोष्टी करण्याच्या मागे लागाल. त्यामध्ये सहज यशही मिळेल. द्रुतगती प्रवास होतील.

वृषभ - आज वाहने जपून चालवावेत. आपल्या खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. अधिक पैशाच्या नादामध्ये चुकीच्या गोष्टी आज करू नका. असा सल्ला आहे.

मिथुन - भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभण्याचा दिवस आहे. केलेल्या गोष्टींमुळे आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढीला लागणार. आयुष्यामध्ये वृद्धी होण्याचा आजचा दिवस आहे.

कर्क - मनोरंजनाकडे कल राहणार आहे. आपले मनोबल कमी राहील. मानसिकता स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांबरोबर, प्रेमाच्या स्नेहीजन यांबरोबर ऊठबस करावी. तब्येत जपा.

सिंह - तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. व्यवसायामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. जुन्या केलेल्या गोष्टींमधून आणि अनुभवातून आज धन मिळण्याची संभावता आहे. रवी उपासना करावी.

कन्या - आपल्या राशीला आज प्रॉपर्टी सौख्य भरभरून मिळणार आहे. जुने, रेंगाळलेले, रखडलेली कामे आज मार्गी लागतील. शेती व्यवसायामध्ये नवनवीन संशोधन आज होईल.

तूळ - ठरवेल ते करणारच अशी काहीशी जिद्द आणि चिकाटी घेऊन आज वावराल. मात्र यामुळे एखादी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडेल. अर्थात ती तर पण तुम्ही लिलया पार पाडण्यात यशस्वी होणार आहात.

वृश्चिक - कोणाला कर्ज दिले असेल, उसने पैसे दिले असतील तर आज वसूल होणार आहेत. आपलं कोण परक कोण याची जाणीव होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू - आपले आरोग्य आज चांगले राहणार आहे. तक्रारी कमी होतील जीवनात जे ठरवाल त्या पद्धतीने नवे मार्ग नवे दिशा आज सापडणार आहेत. सकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागेल.

मकर - आयुष्यात अडचणी आल्याशिवाय अध्यात्माकडे मन वळले जात नाही. आज काही कटकटी वाढतील. त्यामुळे अध्यात्माकडे कल वाढेल. मात्र आपल्या वस्तू गहाळ होणार नाहीत ना, याची दक्षता घ्या.

कुंभ - अनेकांच्या सहकार्याने आज पुढे जाणार आहात. ठरवलेल्या गाठीभेटी पार पडतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. दिवस चांगला आहे.

मीन - तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. पद, प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉसची विशेष करार मदार तुमच्यावर राहील. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : पाकिस्तानने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं; भारताचे ३ तगडे फलंदाज तंबूत परतले

IND Vs PAK Final सामन्यात राडा! जसप्रीत बुमराह संतापला अन् साहिबजादा फरहानला भिडला, नक्की काय घडलं? VIDEO

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपमध्ये नाराजी,माजी नगरसेवक करणार फडणवीसांकडे तक्रार

Hindu rescues Muslim: संकटात एकच धर्म मानवतेचा, मशिदीत अडकलेल्या वृद्धासाठी धावला हिंदू

Jasprit Bumrah : फ्लाइट लँड करा दी...! जसप्रीत बुमराहचा भेदक मारा; हारिस रउफची दांडी गुल, VIDEO

SCROLL FOR NEXT