आजचे पंचांग
सोमवार,१८ ऑगस्ट २०२५,श्रावण कृष्णपक्ष,
शिवमुष्टि (जवस)
तिथी- दशमी १७|२३
रास- वृषभ १४|४० नं. मिथुन
नक्षत्र-मृग
योग-हर्षण
करण-वणिज ०६|२३
विष्टीकरण १७|२३
दिनविशेष-भद्रा वर्ज्य
मेष - काहींना अचानक धनलाभाची याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. लग्नाची आवक चमक चांगली राहणार आहे. आनंदी दिवस कुटुंबियांबरोबर व्यतीत कराल.
वृषभ - एखाद्या कामाशी निगडित उत्साह आणि उमेदीने वाटचाल कराल. अनेक दिवस रखडलेली कामे आज सहज मार्गी लावू शकाल. स्वतःसाठी वेळ द्याल. अध्यात्मिक प्रगती सुद्धा होईल.
मिथुन - लांबचे प्रवासाच्या दृष्टीने आपली काळजी घेणे आज गरजेचे आहे. प्रवास शक्यतो टाळणे योग्य राहील. वाहने जपून चालवावीत. महत्त्वाचे ऐवज आणि जिन्नस यांच्याकडे विशेष लक्ष द्या.
कर्क - मित्र मैत्रिणीच्या सहवासाने दिवस प्रफुल्लित राहील. नियोजित दैनंदिन कामे ठरतील. तसेच मार्गी लागतील. त्याचा विशेष आनंद आज असेल. दिवस समाधानी आहे .
सिंह - आपले आरोग्य आज उत्तम राहणार आहे. कार्यक्षेत्र वाढते राहून जोमाने प्रगतीच्या वाटचालीवर रहाल. आपल्या आजूबाजूच्या सर्वच लोकांचे सहकार्य मिळाल्यामुळे "दुधात साखर" असा काहीसा दिवस आजचा आहे.
कन्या - तुम्ही घेतलेले निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. मनामध्ये रुंजी घालणाऱ्या गोष्टी आज खऱ्या होतील. मन आनंदी आणि आशावादी राहणार आहे. निश्चित विष्णू उपासना करावी.
तूळ - कोणालाही जामीन राहू नका. अन्यथा "आ बैल मुझे मार" अशी काहीशी अवस्था होईल. मनोबल आज कमी राहील.यासाठी शांततेने आपले ध्येय पार करणे गरजेचे आहे.
वृश्चिक - तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. एकूणच कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी आणि प्रगती,प्रसिद्धी आज लागणार आहे. इतरांचे करता करता स्वतःची सुद्धा प्रगती आज सहज साधून घ्याल.दिवस चांगला आहे.
धनु - कर्मचारी वर्गाचे योग्य ते सहकार्य मिळेल.कामाला गती मिळेल काही ठिकाणी मात्र निर्णय जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. विनाकारण पैसा वाया जाण्याची दाट शक्यता आहे.तब्येत जपावी.
मकर - वैचारिक परिवर्तनाचा दिवस आहे दिशा आणि मार्ग बदलून चांगले काही आयुष्यात आज घडेल. नव्या पथावर वाटचाल कराल. शिव उपासना आज फलदायी ठरणार आहे. धनयोग उत्तम आहेत.
कुंभ - व्यवसाय वृद्धीचा आजचा दिवस आहे. एखादे धार्मिक कार्यक्रम, घरगुती सोहळा होण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. एकूणच सौख्य घेऊन आलेला दिवस आहे.
मीन - नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे. जिद्द आणि चिकाटीने मार्गक्रमण कराल. महत्वाचे पत्रव्यवहार जे रेंगाळलेले आहेत ते आज मार्गी लागतील. भावंड सौख्य उत्तम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.