horoscope  Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : गुप्त शत्रू त्रास देतील, अडचणीवर मात करावी लागेल; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना गुप्त शत्रू त्रास देतील. काही जणांना अडचणीवर मात करावी लागेल.

Anjali Potdar

आजचे पंचांग

सोमवार,४ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष,

शिवमुष्टि (तीळ)

तिथी-दशमी १०|४२

रास- वृश्चिक

नक्षत्र- अनुराधा

योग-ब्रह्मा

करण-गरज

दिनविशेष-९ प. चांगला

मेष - जोडीदाराकडून धन लाभाची शक्यता आहे. जोडीदाराच्या कुटुंबीयांकडून चांगले संबंध आज प्रस्थापित होतील. जी गोष्ट ठरवावी ती होईल पण आव्हाने स्वीकारावे लागतील.

वृषभ - व्यवसायामध्ये नवीन वाटा, नवीन दिशा आज सापडणार आहेत. महत्त्वाच्या बैठका पार पडतील. नव्या संकल्पनेतून पेटून उठाल. कोर्टाच्या कामातही यश मिळेल. दिवस चांगला आहे.

मिथुन - आजोळी प्रेम वाढेल. मामाशी संबंध दृढ होतील. तब्येतीच्या मात्र थोड्या तक्रारी आज राहतील. मानसिकता सांभाळावी लागेल. गुप्त शत्रू त्रास देतील काळजी घ्या.

कर्क - प्रेमामध्ये सफलता प्राप्त होणार आहे. आपले साधेपण आपल्या पार्टनरला आवडेल. एकूण चांगले हितगुज होईल. धन योगालाही दिवस उत्तम आहे. संतती सुवार्ता कानी येतील.

सिंह - घरामध्ये नवीन काहीतरी खरेदी होईल. वेगळा यशाचा मार्ग मिळेल. कामाच्या ठिकाणी पत आणि सन्मान मिळतील. दिवस सुखाच्या वाटा घेऊन आलेला आहे.

कन्या - बौद्धिक गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन यश मिळवाल. हिशोबाला चोख असणारा आजचा दिवस आहे. कामाचे निगडित भाग्यकारक घटना घडणार आहेत. अडचणी आल्या तरी मात करून पुढे जाल.

तूळ - धनाची आवकजावक उत्तम राहील. सोने खरेदी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टी मधून फायदा संभवतो आहे. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - सकारात्मकता वाढीला लागेल. मनासारख्या घटना घडतील. आरोग्य उत्तम राहील. अनेक डगरिवर पाय ठेवून आज कामे कराल. पण यश खेचून आणायला नक्कीच दिवस चांगला आहे.

धनु - वायफळ पैसा खर्च होईल.ताकास तूर लागणार नाही. निर्णय घेतला असेल तर अनेक बाबतीत आज संभ्रम राहील. प्रेमामध्ये सुद्धा अपयश संभवते आहे. अध्यात्माची ओढ वाटेल.

मकर - मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात आज राहाल. आपले कोण परके कोण याची जाणीव होईल. जुने संबंध आणि नाती आज दृढ होतील. परदेशी वार्तालाप होईल .

कुंभ - समाजामध्ये मान उंचावून जाल. वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा लाभेल.सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन कामे करा. स्वतःच्या आत्मविश्वास आज बळावलेला राहील.

मीन- दत्तगुरूंची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे.उपासना फलदायी ठरणार आहे. तीर्थक्षेत्री भेटी होतील. मोठे प्रवास घडतील. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai to Pune : मुंबई-पुणे फक्त ९० मिनिटांत, तिसऱ्या एक्सप्रेस वेचा आराखडा तयार, पाहा नेमका मास्टरप्लॅन

Maharashtra Live News Update : श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी भिमाशंकरला भाविकांनी गर्दी केली

Box Office Collection : अजय, सिद्धांत की अहान; वीकेंडला तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Car Stunt Viral Video: धावत्या कारमध्ये तरूणाईची जिवघेणी स्टंटबाजी; पुणे बंगळुरू हायवेवर नेमकं काय घडलं? Video

Shocking News : अमरावती हादरली! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा, प्रेम संबंधामुळे नवऱ्याने घात केला

SCROLL FOR NEXT