Budh Uday saam tv
राशिभविष्य

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Budh Uday: अर्थव्यवस्था आणि व्यापार यांचा कारक मानला जाणाऱ्या बुध ग्रहाचा येत्या काळात उदय होणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना धनलाभ होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह राशीचील बदलाप्रमाणे उदय आणि अस्त देखील होतात. अर्थव्यवस्था आणि व्यापार यांचा कारक मानला जाणाऱ्या बुध ग्रहाचा येत्या काळात उदय होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध ग्रहाच्या या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुधाच्या उदयाचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना धनलाभ होऊ शकतो. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कन्या रास

बुध ग्रहाच्या उदयामुळे या राशींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवं काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर हे लाभदायक ठरू शकतं. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणार आहे. तुमच्या जीवनात साकारात्मक परिणाम होणार आहे.

मकर रास

बुध ग्रहाचा उदय या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला कामामध्ये चांगलं यश मिळू शकणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य घडू शकणार आहे. नवी नोकरी मिळण्याची संधी आहे.

तूळ रास

बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत. तुमच्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळू शकणार आहे. तुमच्या नशिबाला सकारात्मक कलाटणी मिळणार आहे. मुलांबाबत तुम्हाला चांगली बातमी समजू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

SCROLL FOR NEXT