budh uday oct 
राशिभविष्य

Budh Uday: येत्या काळात बुध ग्रह बदलणार स्थिती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Budh Uday In Libra 2024: ज्योतिष शास्त्रात बुध हा वाणी, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. बुधाच्या स्थिती बदलाचा काही राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रह त्यांच्या ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याचप्रमाणे काही ग्रह उदय आणि अस्त देखील होतात. ज्योतिष शास्त्रात बुध हा वाणी, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेचा कारक मानला जातो. आगामी महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार आहे.

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी बुध ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रह तूळ राशीमध्ये उदयाला जाणार आहे. यावेळी बुधाच्या स्थिती बदलाचा काही राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास

बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकणार आहेत. नोकरदार आणि व्यापारी पैसे कमावण्याचे साधन बनतील. तुम्ही सर्वात मोठी कामं सहज सोडवू शकणार आहात. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे.

मकर रास

बुधाचा उदय मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. या काळात वडिलांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे. या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळणार आहे.

कन्या रास

बुध ग्रहाचा उदय या राशीसाठी लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्ही सर्वात मोठी समस्या सहज सोडवू शकणार आहात. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकणार आहेत. या काळात बँकींग क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगले लाभ मिळू शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT