राशिभविष्य

Budh Gochar: ऑक्टोबरमध्ये २ वेळा बदलणार बुध करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना येणार लग्नाचे प्रस्ताव

Budh Transit On October 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह बरेचदा एकाच महिन्यामध्ये दोन वेळा गोचर करतो. ग्रहांचा राजकुमार बुध 10 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुध ग्रह बरेचदा एकाच महिन्यामध्ये दोन वेळा गोचर करतो. सप्टेंबर महिन्यात देखील बुध ग्रहाने दोन वेळा गोचर केलं. चंद्रानंतर बुध हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे.

सप्टेंबर महिन्याप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यात देखील बुध ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध 10 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर २९ तारखेला बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.

बुध ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. यामध्ये काही राशींच्या मनाजोग्य गोष्टी घडल्याने त्या व्यक्ती आनंदात असतील. तर काही राशींना भरपूर प्रमाणात पैसे मिळणार आहेत. जाणून घेऊया बुधाचं गोचर कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.

तूळ रास

बुध राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसणार आहे. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

वृश्चिक रास

बुधाचं गोचर या राशींसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. तुमचं जीवन सुधारण्यासाठी काही गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात. नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. यावेळी नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तुमची स्वप्नं पूर्ण होणार आहेत.

मकर रास

बुध राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आणि त्या सर्व गोष्टींमध्ये यश मिळणार आहे. भूतकाळात केलेल्या कठोर मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला वेळ आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या कामात यश गाठता येणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT