Budh Gochar 2025 Saam Tv
राशिभविष्य

Budh Gochar 2025: बुध चाल बदलणार, दसऱ्यानंतर या ५ राशींचे नशीब बदलणार; हातात येणार पैसाच पैसा

Budh Gochar 2025 Mercuri Transit: दसऱ्यानंतर बुधाचे तुळ राशीत संक्रमण होणार आहे. या बदलामुळे मेष, कर्क, धनु आणि मकर राशींना आर्थिक लाभ, व्यवसायात प्रगती आणि कौटुंबिक आनंद मिळणार आहे.

Manasvi Choudhary

Budh Gochar Dussehra Astrology Predictions: २ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा हा सण साजरा होईल. यंदा दसरा अत्यंत खास आहे. दसऱ्याच्या शुभ दिनी अर्थात २ ऑक्टोबरला मध्यरात्री ३ वाजून ४३ मिनिटांनी बुधाचे तुळ राशीत संक्रमण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्योदयाआधीच बुध ग्रह तुळ राशीत प्रवेश करणार असल्याने त्या दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे. सध्या बुध सूर्यासोबत कन्या राशीत आहे आणि त्याच्या अस्ताच्या स्थितीत आहे. बुधाच्या योगामुळे काही राशींना फायदा होणार आहे. त्या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊया.

ज्योतिषानुसार, ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बुध ग्रहाचे तूळ राशीत संक्रमण होईल मंगळासोबत बुधाची युती होणार आहे. यामुळे बुध–मंगळ योग तयार होईल. या महत्त्वाच्या योगाचा शुभ परिणाम मेष, कर्कसह अनेक राशींवर होणार असून त्यांना जीवनात यश, प्रगती आणि लाभाचे नवे मार्ग खुले होतील.

मेष राशी

  • मेष राशीसाठी बुध राशींचे संक्रमण लाभदायक असेल.

  • या काळात व्यापारात चांगले यश मिळेल

  • कुटुंबात आनंदी वातावरण असेल तर तर करिअरच्या दृष्टीनेही उत्तम प्रगती होईल.

कर्क राशी

  • कर्कच्या चौथ्या स्थानात बुधाचे संक्रमण होत असून मंगल-चंद्र युतीमुळे जीवनात आनंदाची भर पडेल.

  • दीर्घकाळाच्या अडचणी दूर होतील. आर्थिक स्थितीत सुधारेल

  • आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या बुधाचे संक्रमण अत्यंत शुभ ठरेल.

धनु राशी

  • धनु राशीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

  • कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

  • नवे आर्थिक लाभाचे मार्ग सुरू होतील.

मकर राशी

  • मकर राशीच्या दहाव्या स्थानात बुधाचे संक्रमण होत आहे.

  • मंगल-चंद्र युतीमुळे व्यवसायात मोठ्या संधी मिळेल.

  • व्यापारी वर्गाला प्रगतीचे नवे मार्ग दिसतील.

  • कार्यक्षेत्रात मेहनतीमुळे आर्थिक लाभ वाढेल.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asha Bhosle Passes Away: सुरांचा अमूल्य ठेवा हरपला; ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

Maharashtra News Live Update: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन

Kairicha Thalipeeth: आंबट कैरीचं कुरकुरीत थालीपीठ; उन्हाळ्यातील स्पेशल रेसिपी, वाचा

Eye Makeup: प्रायमरपासून ते मस्करा; परफेक्ट आय मेकअप कसा करावा, डोळ्यांना मिळेल ग्लॅमरस लूक

Viral Wedding Video: अरे देवा! हुड्यांत कार दिली नाही म्हणून लग्नातूनच पळून गेला नवरदेव, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT