Kanya Pujan 2025: नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्या पूजा का करतात?

Dhanshri Shintre

महाअष्टमी आणि महानवमी

नवरात्रीत महाअष्टमी आणि महानवमीला कन्या पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे, कारण असे मानले जाते की यामुळे देवी दुर्गा अत्यंत प्रसन्न होतात.

भेटवस्तू

नवरात्रीमध्ये देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मुलींच्या विविध रूपांची पूजा केली जाते, त्यांना फळे, फुले, मिठाई, सौंदर्यप्रसाधने आणि भेटवस्तू अर्पण केल्या जातात.

नऊ मुलींची पूजा

धार्मिक परंपरेनुसार, कन्या पूजनात नऊ मुलींची पूजा केली जाते आणि प्रत्येक मुलीचे एक वेगळे, खास आणि महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते.

एका मुलीची पूजा

एका मुलीची पूजा केल्यास समृद्धी प्राप्त होते, तर दोन मुलींची पूजा केल्यास जीवनात सुख आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते.

तीन मुलींची पूजा

नवरात्रीत तीन मुलींची पूजा केल्याने धन, धार्मिकता आणि इच्छापूर्ती प्राप्त होते, तर चार मुलींची पूजा केल्यास राजेशाही मिळते असे मानले जाते.

पाच मुलींची पूजा

नवरात्रीत पाच मुलींची पूजा केल्यास ज्ञान प्राप्त होते, तर सहा मुलींची पूजा केल्याने सहा प्रकारच्या सिद्धींचा लाभ मिळतो असे मानले जाते.

सात मुलींची पूजा

नवरात्रीत सात मुलींची पूजा केल्यास सौभाग्य प्राप्त होते, तर आठ मुलींची पूजा केल्यास जीवनात सुख आणि समृद्धी मिळते असे मानले जाते.

नवरात्रोत्सवात नऊ मुलींची पूजा

देवी दुर्गा समर्पित नवरात्रोत्सवात नऊ मुलींची पूजा केल्यास पृथ्वीवर सत्ता आणि प्रभुत्व प्राप्त होते असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते.

NEXT: नवरात्रीत घट का बसवतात? जाणून घ्या पारंपरिक परंपरेचे महत्त्व

येथे क्लिक करा