Budh Ketu Yuti saam tv
राशिभविष्य

Budh Ketu Yuti: 2 दिवसांनी बनणार बुध-केतूचा संयोग; 'या' राशींना मिळू शकणार धनलाभ, उत्तम संधी चालून येणार

Ketu and budh yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे गोचर आणि त्यांची युती मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. येत्या दोन दिवसांत, एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना घडणार आहे. बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि गूढ, आध्यात्मिक ग्रह केतू यांची युती होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषानुसार सध्या सिंह राशीत छाया ग्रह केतुचा संचार सुरू आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी बुध ग्रहही सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दिवशी सिंह राशीत बुध आणि केतुचा संयोग तयार होणार आहे. हा संयोग तब्बल १८ वर्षांनी होत आहे, कारण केतुने एवढ्या मोठ्या काळानंतर सिंह राशीत प्रवेश केला आहे.

बुध आणि केतू ग्रहाच्या या संयोगामुळे काही राशींचे नशीब खुलू शकणार आहे. अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नवे संधीचे दरवाजे उघडू शकणार आहेत. पाहूया, कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध-केतूचा हा महायोग उत्पन्न आणि लाभाच्या दृष्टीने अतिशय शुभ ठरणार आहे. कारण हा संयोग तुमच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानावर तयार होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला फायदा मिळू शकतो. मुलांकडून आनंददायक बातमी मिळू शकते तसेच कुटुंबासोबत घालवलेला वेळ सुखदायी ठरणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी बुध आणि केतुचा हा संयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. या काळात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकणार आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्यही लाभेल. कार्यक्षेत्रात नवी जबाबदारी आणि नवे प्रकल्प मिळतील.

वृषभ रास

वृषभ राशीसाठी बुध-केतूचा संयोग लाभदायक ठरेल. घर, वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग तयार होतील. कामाच्या ठिकाणी तुमची सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण यांची दखल घेतली जाईल. त्यामुळे नवी जबाबदारी मिळेल किंवा पदोन्नती होऊ शकणार आहे. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

१८० किमी वेगाने धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन; लोको पायलटच्या केबिनमधून सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Rupali Bhosle Serial: अभिनेत्री रूपाली भोसलेची पहिली मराठी मालिका कोणती होती?

Lasun Shev Recipe: नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत अन् झणझणीत लसूण शेव, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT