Budh Gochar In Kanya google
राशिभविष्य

Budh Gochar : तब्बल वर्षभराने बुध करणार स्वराशीत प्रवेश; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Budh Gochar In Kanya: ग्रहांच्या गोचरचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होतो. येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये बुध ग्रह स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष्यशास्त्रानुसार, सुमारे 1 वर्षानंतर बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत काही राशींचं नशीब चमकू शकणार आहे. त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

सिंह रास (Leo Zodiac)

बुध ग्रहाचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. तुम्ही पैसे कमावण्यासोबतच यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे. बँकिंग आणि शिक्षण या क्षेत्रांशी संबंधितांना चांगले पैसे मिळू शकतात.

धनु रास (Dhanu Zodiac)

बुध ग्रहाचं गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यावर अधिक असणार आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. या काळात कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल. नफा मिळण्याची अधिक शक्यता आहे.

मिथुन रास (Mithun Zodiac)

बुध राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगलं उत्पन्न मिळू शकतं. हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; पालकांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर

Kalyan : जेलच्या गेट बाहेरच गुंडाचा वाढदिवस; पोलिसांनी दिला 'मुळशी पॅटर्न' स्टाइल दणका

तुम्ही एक्सपायर झालेली अंडी खाताय? अंड्यावरही आता एक्सपायरी डेट

SCROLL FOR NEXT