rajyog saam tv
राशिभविष्य

Vipreet Rajyog: 50 वर्षांनंतर बुध ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींना मिळणार पद-प्रतिष्ठा, नशीबही चमकणार

Vipreet Rajyog 2025: कुंभ राशीत शनी, रवि आणि बुध यांची युती निर्माण झाली आहे. यामुळे विपरीत राजयोगही निर्माण झाला आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे काही शुभ तर काही अशुभ राजयोग तयार होत असतात. या राजयोगांचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तीवर होत असतो. अशातच बुध ग्रहाने एक राजयोग तयार केला आहे.

ग्रहांचा राजकुमार बुध अजूनही अस्त असून त्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे कुंभ राशीत शनी, रवि आणि बुध यांची युती निर्माण झाली आहे. यामुळे विपरीत राजयोगही निर्माण झाला आहे. अशावेळी काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना पैसे मिळण्याची शक्यता आहे तर काहींना या काळात नोकरीची नवी संधी मिळू शकते. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

कर्क रास

विपरीत राजयोग आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक लाभ मिळू शकतात. उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे कमवू शकाल. त्याचबरोबर शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुमचा काम-व्यवसाय रिअल इस्टेट, प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेटशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोगाची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला मान-सन्मान मिळू शकतो. अपघाती धनप्राप्ती होऊ शकते. उत्पन्न वाढीचीही शक्यता राहील. सुखसोयींची इच्छा वाढणार आहे.

धनु रास

विपरीत राजयोगाची निर्मिती आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला अडकलेले पैसे मिळणार आहेत. तुम्ही नवीन योजना आखू शकता ज्यामुळे नफा होऊ शकतो. घराच्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. या वेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaitanyanand Swami: विद्यार्थिनींना धमकावून चैतन्यानंद सरस्वतीकडे पाठवायच्या, इन्स्टिट्यूटच्या ३ महिला अधिकाऱ्यांना अटक

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

SCROLL FOR NEXT