Budh Shukra Yuti 2025 Effects saam tv
राशिभविष्य

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Mars Venus Conjunction money fortune: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ आणि धन, सौंदर्य व सुखाचे कारक ग्रह शुक्र नोव्हेंबर एकत्र येणार आहेत

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ते वेळोवेळी दुर्मिळ संयोग करत असतात. यामध्ये काही संयोग हे शुभ असतात तर काही संयोग हे काही राशींसाठी अशुभ मानले जातात. असाच नोव्हेंबरमध्ये दुर्मिळ योग तयार होणार आहे.

२६ नोव्हेंबर रोजी धन दाता शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्याठिकाणी पहिल्यापासूनच मंगळ ग्रह विराजमान आहे. अशामध्ये वृश्चिक राशीत मंगळ आणि शुक्र ग्रहांची युती होणार आहे. या युतीमुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. यामध्ये काही राशींना चांगला पैसा मिळू शकणार आहे. अशावेळी कोणत्या राशी लकी ठरणार आहे ते पाहूयात.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

या राशींसाठी मंगळ आणि शुक्राचा योग फलदायी ठरणार आहे. यावेळी तुमचं इनकम डबल होणार आहे. व्यापारात तेजी येण्याची शक्यता आहे. मोठं डील होणार असून त्यातून तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे. शेअर बाजारातून तुमच्या हाती चांगला पैसा येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला इतरांची मदत मिळणार आहे.

मीन रास (Meen Zodiac)

या राशींच्या लोकांना मंगळ शुक्राची युती लाभदायक ठरणार आहे. यावेळी तुमचं नशीब तुम्हाला चांगली साथ देणार आहे. कामासाठी तुम्ही मोठा प्रवास करणार आहात. या प्रवासाने तुमचा मोठा फायदाही होणार आहे.विद्यार्थ्यांना या काळात चांगलं यश मिळणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे.

तूळ रास (Libra Zodiac)

मंगळ आणि शुक्राची युती तुम्हाला मालामाल करणार आहे. यावेळी तुमच्या नशीबात धनलाभाचे संकेत आहे. यश आणि आत्मबल तुमच्या कुंडलीमध्ये आहे. या काळात तुम्हाला नवी नोकरीही मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

मविआमध्ये राज ठाकरे पाहिजेच, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, बैठकीत नेमके काय घडले? VIDEO

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

Maharashtra Politics: निवडणुकीत पैसे वाटताना रंगेहाथ पकडलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; महायुतीत चाललंय काय?

HCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार पगार १.२० लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT