Surya Gochar 16 August 2024 Saam Tv
राशिभविष्य

Sun-Mangal Yuti: 18 वर्षांनी तयार होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Sun And Mangal Conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात आणि एकमेकांसोबत युती करतात, ज्यामुळे शुभ-अशुभ योग तयार होतात. सूर्य आणि मंगळाची युती ही एक शक्तिशाली युती मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रह हा प्रतिष्ठा, आत्मविश्वास, सत्ता, राजकारण, नोकरी, प्रशासन, यांचा कारक मानला जातो. तर दुसरीकडे मंगळ ग्रह हा शौर्य, पराक्रम, साहस, क्रोध, रक्त, आणि प्रॉपर्टी यांचा प्रतिनिधी असतो. सूर्याला राजांचा राजा मानले जाते, तर मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र आहेत आणि जेव्हा हे एकत्र येतात. तेव्हा त्यांच्या युतीचा प्रभाव खूप मोठा आणि परिणामकारक असतो.

ऑक्टोबर २०२५ मध्ये सूर्य आणि मंगळ एकत्र येणार असून त्यांची युती तुला राशीत होणार आहे. ही युती संपूर्ण राशींवर प्रभाव टाकणार आहे. काही राशींना हा काळ अत्यंत शुभ फलदायक ठरणार आहे. विशेषतः तीन राशींसाठी हा काळ सुवर्णसंधीसारखा असू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य-मंगळ युती विशेष लाभदायक ठरू शकणार आहे. कारण ही युती त्यांच्या राशीच्या लग्न भावात होणार आहे. नवीन लोकांशी ओळखी होणार आहे. जे भविष्यात फायदेशीर ठरतील. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. विवाहित लोकांचा संसार सुखकर राहील. तर ज्यांचं लग्न अद्याप झालेलं नाही, त्यांना विवाहासाठी योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी ही युती इनकम व लाभ स्थानात होणार आहे. त्यामुळे ही युती अत्यंत लाभदायक ठरू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. नवीन इनकम सोर्सेस सुरू होऊ शकतात. जमिनीशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ योग्य आहे.

मीन रास

या काळात मीन राशीच्या लोकांना कामात विशेष यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही वेळ चांगली आहे. व्यवसायात वाढ होईल, नवीन ऑर्डर्स येतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

SCROLL FOR NEXT