Mahalakshmi Yog 2025 saam tv
राशिभविष्य

Mahalakshmi Yog: मंगळ-चंद्र बनवणार महालक्ष्मी राजयोग; ८ फेब्रुवारीपासून चमकणार 'या' राशींचं नशीब, लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार

Mahalakshmi Yog 2025: 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.20 वाजता चंद्र या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मिथुन राशीमध्ये 18 महिन्यांनंतर मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे महालक्ष्मी योग तयार होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक नऊ ग्रहांचं वर्णन करण्यात आलं आहे. या शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. या बदलाचा 12 राशींच्या व्यक्तींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होताना दिसतो. यावेळी चंद्र हा एकमेव ग्रह आहे जो सुमारे अडीच दिवसात आपली राशी बदलतो.

दुसरीकडे सध्या मंगळ कर्क राशीत असून 21 जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.20 वाजता चंद्र या राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत मिथुन राशीमध्ये 18 महिन्यांनंतर मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे महालक्ष्मी योग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे, ते पाहूयात.

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात तुम्हाला मोठं यश मिळू शकणार आहे. नोकरीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही नोकरीतही भरपूर यश मिळवू शकता. व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. आर्थिक स्थितीही चांगली राहण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे.

सिंह रास

चंद्र आणि मंगळाच्या युतीने तयार होणारा महालक्ष्मी योग या राशीच्या लोकांसाठी आनंद आणू शकणार आहे. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी कृपा करणार आहे. तुम्ही भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. पैसे वाचवण्यात यशस्वी देखील होऊ शकतात. व्यवसायात चमकदार कामगिरी करू शकणार आहात. जोडीदारासोबतचं तुमचं नातं चांगलं राहणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीत मंगळ आणि चंद्राच्या युतीने तयार झालेला महालक्ष्मी योग पाचव्या भावात तयार होईल. या राशीच्या लोकांना मोठ्या आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळू शकणार आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असणार आहे. या काळात तुम्हाला पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT