Budh Uday And Mangal Margi saam tv
राशिभविष्य

Lucky Zodiac Sign: मंगळ मार्गी आणि बुधाचा उदय 'या' 3 राशींना मिळवून देणार पैसा; चांगल्या पगारासह मिळणार नवी नोकरी

Budh Uday And Mangal Margi 2025: ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह नुकतंच म्रार्गी झाला आहे. ज्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच देश आणि जगावर दिसून येतो. ग्रहांचा सेनापती मंगळ 24 फेब्रुवारीला मार्गी झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक अंतरानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह राशी बदलाप्रमाणे उदय आणि मार्गी देखील असतात. ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम देखील प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होत असतो. यावेळी याचा परिणाम काही राशींवर सकारात्मक होतो तर काही राशींवर नकारात्मक होताना दिसतो.

नुकतंच शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह नुकतंच म्रार्गी झाला आहे. ज्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच देश आणि जगावर दिसून येतो. ग्रहांचा सेनापती मंगळ 24 फेब्रुवारीला मार्गी झाला आहे. याशिवाय ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा 2 एप्रिल रोजी उदय होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहे.

वृषभ रास

तुमच्यासाठी उगवणारा बुध ग्रह तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. मंगळ तुमच्या राशीतून धनाच्या घरात भ्रमण करतोय. या वेळी तुमचं काम करणाऱ्या लोकांना लाभासह काही नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. तुमचा आर्थिक ताण कमी होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि मंगळाचे संक्रमण फायदेशीर ठरू शकणार आहे. या वेळी तुमचे धाडस आणि पराक्रम वाढणार आहे. जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण केल्यास धनलाभाची शक्यता वाढू शकते. आपल्या रखडलेल्या कामांना गती मिळू शकते.

धनु रास

तुमच्यासाठी बुध ग्रहाचा उदय आणि मंगळाची थेट हालचाल फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण तुमच्या राशीतून बुध ग्रह चौथ्या भावात उगवणार आहे. तसेच मंगळ तुमच्या गोचर कुंडलीतील सातव्या भावावर थेट असणार आहे. या वेळी तुम्हाला शारीरिक सुख मिळू शकतं. या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT