Makar Rashi Bhavishya Today Saam TV
राशिभविष्य

Makar Rashi Career : मकर राशीचे लोक स्वभावाने कसे असतात? जाणून घ्या त्यांच्या १० खास गोष्टी

Capricorn Rashi Personality : मकर राशीचे लोक संधीचे सोने करणारे असतात. हिशोबी, चौकस व व्यवहारी असतात. लोकांची पारख चांगली असते.

Anjali Potdar

मकर रास पृथ्वीतत्त्वाची रास. अर्थ त्रिकोणाची रास आहे. दशम भावाची द्योतक आहे. समाजामध्ये नावलौकिक मिळणे आणि त्या अर्थाने जीवन आपले जीवन जगतात. अर्थ म्हणजे पैसा यांना धरुनच हे लोक पुढे जातात. काही वेळेला व्यवहारी आणि भावना शून्य असतात. पण तरी आलेल्या संधीचे सोने करणारे असतात. हिशोबी, चौकस व व्यवहारी असतात. लोकांची पारख चांगली असते.

अर्थतत्व आहे म्हणून हे लोक बँक मध्ये, भिशी, तत्सम व्यवहार सांभाळणारे असतात. चर रास असल्याने फिरती, भ्रमंती यांना आवडते किंवा वाट्यास येते म्हणू शकतो.यांना हिशोब चांगला जमतो. शनीची रास आहे, त्यामुळे सातत्याने कष्ट आणि मेहनत आपल्या पाचवीला पुजलेले आहेतच. जातात चिकित्सक असतात. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासले जाते तरच त्यांच्यावर विश्वास ठेवतात.

स्वभावात संशय सुद्धा असतो. कोणतेही काम दीर्घसूत्रीने करतात. विद्वतेचा कारक गुरू मात्र इथे फुलत नाही. गुरुला ही मानवत नाही आणि म्हणून या राशीत गुरु नीच होतो. मकर राशीमध्ये मंगळ हा उच्चीचा होतो. जातक प्रत्येक गोष्ट ही सहनशील वैचारिक पातळीवर जाऊन तावून सुलाखून काम करताना दिसून येतात.

कधी कधी रास बिघडली तर आळशीपणाचे वागणे, बोलणे काही रटाळ, अति चिकित्सक आणि किचकट पण आहे दुर्गुण या राशीमध्ये आढळून येतात. काही वेळेला बोलताना नमनाला घडाभर तेल आणि दुसरी बाजू म्हणजे अगदीच अबोला अशा दोन टोकाच्या गोष्टी यांच्यात असतात. वक्तृत्वात तशी ही रास कमी पडते.

नोकरी व्यवसायाचा विचार केला तर कष्टाची कामे आणि मेहनतीच्या गोष्टी हे लोक करू शकतात. बँक, रोखीचे व्यवहार, अर्थत्वाची रास असल्यामुळे येतात. एजंट, तसेच अधिकार पद सुध्दा येते. पण पुढे जाण्यासाठी यांना जास्त मेहनत करावी लागते.

रोग आजाराचा विचार केला तर त्वचा विकार, अस्थि भंग, हाडाचे विकार,सांधेदुखी, पायांचे आजार, वात विकार, शनी हा थंड असल्यामुळे सर्दी, क्षय तसेच दुर्धर आणि जुनाट आजार या लोकांना होऊ शकतात. मकरेच्या लोकांनी कायमस्वरूपी शंकराची उपासना केल्यास फायदा होऊ शकतो. "ओम् नम: शिवाय" जप जास्तीत जास्त करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

SCROLL FOR NEXT