Grah Gochar 2024 saam tv
राशिभविष्य

Grah Gochar 2024: पुढच्या महिन्यात ४ मोठ्या ग्रहांचं होणार गोचर; 'या' राशींचे येणार अचानक सोन्यासारखे दिवस

Surabhi Kocharekar

प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ग्रहाचं गोचर होतं. यावेळी ग्रह गोचरच्या हिशोबाने ऑक्टोबर महिना देखील शुभ ठरणार आहे. आगामी ऑक्टोबर महिन्यामध्ये ४ मोठे ग्रह गोचर करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

वैदिक पंचांगानुसार, पहिल्यांदा बुध 10 ऑक्टोबर 2024 रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 13 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे 17 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार असून शेवटी मंगळ ग्रह 20 ऑक्टोबर 2024 रोजी मंगळ कर्क राशीत गोचर करणार आहे.

ऑक्टोबरमध्ये या चार मोठ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींवर याचा शुभ परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्य यांच्या गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. कौटुंबिक प्रतिष्ठा वाढण्याचीही शक्यता आहे. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. व्यापाऱ्यांची संपत्ती आणि कीर्ती वाढणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते.

सिंह रास

ऑक्टोबरमध्ये 4 मोठ्या ग्रहांचं गोचर या राशींसाठी सकारात्मक सिद्ध होऊ शकणार आहे. व्यावसायिक प्रयत्न फलदायी ठरणार आहेत. तुम्हाला अचानक कुठूनतरी अनपेक्षित पैसे मिळू शकतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पडणार आहे. तुम्हाला कुटुंबात मान-सन्मान मिळू शकणार आहे.

कन्या रास

वृषभ आणि सिंह व्यतिरिक्त बुध, शुक्र, मंगळ आणि सूर्याचं गोचर या राशीच्या लोकांसाठी चांगलं ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. हा काळ तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडणार आहे. विवाहित लोकांना कुटुंबातील सदस्यांकडून भेटवस्तू मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक कामात सहकार्य मिळू शकणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT